उत्सुकता, हुरहूर अन्‌ जल्लोष...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

‘यिन प्रतिनिधीं’ची निवडणूक - जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयांत निवडी

‘यिन प्रतिनिधीं’ची निवडणूक - जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयांत निवडी

सांगली - डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत तरुणाईच्या नेतृत्वाला संधी देणाऱ्या ‘प्रतिनिधी’ निवडी आज ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात जाहीर झाल्या. जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयांतून निवडणुकीद्वारे १५ ‘यिन प्रतिनिधीं’ची निवड झाली. या निमित्ताने तरुणाईच्या सळसळत्या ऊर्जेची प्रचिती मिळाली. मतदानाचे आवाहन करणारे उमेदवार प्रतिनिधी, प्रत्यक्ष मतदान सुरू असतानाची उत्सुकता, मतमोजणीच्या वेळची हुरहूर आणि निकालानंतरचा जल्लोष अशा वातावरणात ही प्रक्रिया झाली. 

महाविद्यालयीन वर्तुळात चर्चेच्या झालेल्या ‘यिन’ महाविद्यालय प्रतिनिधी निवडी आज जाहीर झाल्या. आठ दिवसांपासून निवडणुकीचे वारे प्रत्येक महाविद्यालयात होते. पहिल्या दिवशी शहरातील निवडक महाविद्यालयांत मतदान झाले. दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील महाविद्यालयात मतदान झाले. मतदानासाठी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. काही महाविद्यालयांत तर अक्षरशः रांगा लावून मतदानाचा हक्क विद्यार्थ्यांनी बजावला. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भेटीगाठींचा उमेदवारांनी धडाका लावला होता.

सांगलीसह जिल्ह्यातील महाविद्यालयांत निवडणुकीचा माहोल होता. सांगली ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात आज प्रत्यक्ष मतमोजणी झाली. मतमोजणीच्या वेळी प्रत्येक उमेदवारात हुरहूर होती. उमेदवारांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकाल जाहीर झाल्यानंतर एकच जल्लोष झाला. 

‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. ‘यिन’चे समन्वयक विवेक पवार, प्रशांत जाधव, इंद्रजित मोळे, मोहम्मद मोमीन, वृषाली रजपूत, पौर्णिमा उपळावीकर, सुप्रिया घोरपडे यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. 

‘गरवारे’त जोरदार टक्कर 
श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. मतमोजणीच्या वेळी तीनही उमेदवारांना पहिल्या दोन्ही फेरीत भरभरून मते मिळाली; मात्र निकिता शिंदे आणि राधिका घोरपडे यांनी अखेरच्या टप्प्यात अधिक मते मिळवली. त्यात निकिता शिंदे हिने बाजी मारत सात मतांनी विजय मिळवला. त्यानंतर जल्लोष केला. 

आता दुसरा टप्पा... 
निवडणुकीत मतदान, मतमोजणीनंतर आता दुसरा टप्पा जाहीर केला जाणार आहे. विजयी उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यातून जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली जाईल. त्यानंतर ‘शॉडो मंत्रिमंडळा’ची स्थापनाही केली जाणार आहे. 

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (सांगलीवाडी) - तोहिद मुलाणी,

श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय (सांगली) - निकिता शिंदे   भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट (सांगली)- विनायक सूर्यवंशी

डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय (मिरज) - धानेश्‍वर माळी
चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (सांगली) - राजेंद्र हांडगे
श्रीमती मालतीताई वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय (इस्लामपूर) - लक्ष्मी पुजारी

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज (सांगली) - मकरंद शेंडे

कन्या महाविद्यालय (मिरज) - मिताली पवार \

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील महाविद्यालय - सुरेखा पाटील

राजर्षी शाहू कृषी महाविद्यालय (सांगली) - अक्षय जाधव

शिवाजीराव देशमुख इन्स्टिट्यूट (शिराळा) - सत्यजित कदम

वारणा महाविद्यालय (ऐतवडे खुर्द) - श्रीकांत गायकवाड

आर्टस्‌, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (पलूस) - सुदर्शन लाड

श्रीमती कुसुमताई पाटील कन्या महाविद्यालय (इस्लामपूर) - उत्कर्षा अनुसे बळवंत महाविद्यालय (विटा) - आरमान जमादार

Web Title: sangli news yin election result