शिक्षकांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सांगली - जिल्हा परिषद शाळातील मराठी माध्यमातील उपशिक्षक संवर्गातील ५४६१ जणांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित शिक्षकांना तक्रार आणि हरकतीसाठी आठ दिवसांची  मुदत दिली. त्यानंतर अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. 

सांगली - जिल्हा परिषद शाळातील मराठी माध्यमातील उपशिक्षक संवर्गातील ५४६१ जणांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित शिक्षकांना तक्रार आणि हरकतीसाठी आठ दिवसांची  मुदत दिली. त्यानंतर अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. 

जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांना गेली तीन वर्षे पदोन्नती मिळाली नाही. विविध शिक्षक संघटनांनी पदोन्नतीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे मराठी माध्यमातील ५४६१ प्राथमिक शिक्षकांची १ जानेवारी २०१७ रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. यादीबाबत कोणाची तक्रार किंवा हरकती असल्यास योग्य त्या कागदपत्रांसह कार्यालय प्रमुखांमार्फत आठ दिवसांत जिल्हा परिषदेकडे पाठवावी. मुदतीत आलेल्या तक्रारी आणि हरकतींचा विचार केला जाणार आहे. कार्यालय प्रमुखांनी सेवा ज्येष्ठता यादीची पडताळणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ पाठवावा, अशा सूचना गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत. सेवाज्येष्ठता यादीत त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्यासही सुचवले आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व केंद्रप्रमुखांना याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मराठी माध्यमातील ५४६१ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. १९८२ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांपासून ते २०१७ मध्ये  नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. तीन वर्षांपासून पदोन्नतीची प्रतीक्षा शिक्षकांना लागली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची...

02.00 PM

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू...

01.24 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच...

12.42 PM