सांगली : दररोज जिल्ह्यात खपते एक लाख किलो खाद्यतेल

समतोल आहारात स्निग्ध पदार्थांचे स्थान महत्त्वाचे आहे.
edible-oil
edible-oil sakal media

सांगली: खाद्यतेलाच्या अतिरिक्त वापराचे वयोगटानुसार फायदे-तोटे आहेत. समतोल आहारात तेलाचा योग्य वापर गरजेचा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार प्रतिमाणसी दररोज ३० ते ४० ग्रॅम खाद्यतेलाचा वापर होते. सरासरी ३५ ग्रॅमप्रमाणे सांगली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३० लाख गृहित धरली, तरी दररोज १ लाख ५ हजार किलो तेल जिल्ह्याला दररोज खपते. महागाई वाढली की ग्राहक तेलाची खरेदी १५ किलोच्या डब्यापेक्षा पाच किलो आणि गरीब लोक किलोने खरेदी करतात. जिल्ह्यासाठी १५ किलोच्या सरासरीने ६ हजार ५०० ते सात हजार डब्यांचा खप होतो.

समतोल आहारात स्निग्ध पदार्थांचे स्थान महत्त्वाचे आहे. मात्र, त्याचे प्रमाण योग्य ठेवावे. आरोग्यासाठी समतोल आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण असते. समतोल आहारात पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेटस्‌), स्निग्ध पदार्थ (फॅट्स), प्रथिने, विविध जीवनसत्वे, क्षार, खनिज पदार्थ आणि पाणी असे सर्व घटक आहारात योग्य प्रमाणात नसेल तर ताळमेळ बिघडतो. आजच्या जीवनशैलीत फास्ट फूड, जंकफूडचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामध्ये स्निग्ध पदार्थांचा वापर भरपूर असतो. युवकात अतिरिक्त वजनवाढ, स्थूलत्वाचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण हे आहे. केवळ घरचे अन्न खाणाऱ्यांनाही वजनवाढ, स्थूलत्व दिसून येते. त्यांच्या आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त असतो.

स्निग्ध पदार्थांचे वनस्पतिजन्य आणि प्राणीजन्य प्रकार आहेत. स्वयंपाकात वापरली जाणारी विविध तेले, तूप, लोणी, वनस्पती तूप यांना ‘दृश्य’ स्निग्ध पदार्थ मानतात. शेंगदाणे, खोबरे, काजू, प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) वेगवेगळे अन्नपदार्थ उदाहरणार्थ वेफर्स, फरसाण, चिवडा आणि मटण, चिकन, मासे, अंडी अशा साऱ्या मांसाहारी पदार्थांमध्ये असलेल्या स्निग्धतेला ‘अदृश्य’ स्निग्ध पदार्थ मानतात. ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये माणशी रोज १५ ग्रॅम, शहरी भागात ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थांचा रोजचा वापर करतात. अतिरिक्त वापर प्रौढांमध्ये झाल्यास टोटल आणि एलडीएल कोलेस्टेरॉल वाढून उच्च रक्तदाब, हृदयविकार होतात.

आरोग्यदायी स्निग्ध आहार

आहारात स्निग्ध पदार्थ १५-३० टक्के एवढे कमी असावेत

मांसाहार, अंडी मर्यादित असावेत

वनस्पतिजन्य स्निग्ध पदार्थ वापरावेत

तूप, लोणी, रिफाइंड तेले स्वयंपाकात अगदी कमी वापरावीत

दुग्धजन्य पदार्थ साय/मलईविरहित वापरावेत

शेंगा, हिरव्या पालेभाज्या, मेथ्या, मोहरीत स्निग्ध द्रव्य असते

हृदयविकार, रक्तदाबाच्या विकाराची शक्यता कमी होते

मांसाहारामध्ये अंडी, मटण, लिव्हर, ब्रेन यांच्यापेक्षा मासे खाण्यावर भर द्यावा

आठवड्यातून जास्तीत जास्त तीन वेळा अंडे खावे

पिवळ्याऐवजी पांढरा बलक घ्यावा

फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, बेकरीचे पदार्थ खाणे टाळावे

एकदा तळण झाल्यावर स्वयंपाकाचे तेल पुन्हा-पुन्हा वापरू नये

मासा हा उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा आणि कमी चरबीचा उत्कृष्ट स्रोत आहे

चिकन लोकप्रिय व कमी चरबीयुक्त अन्नपदार्थ आहे

व्हिटॅमिन ब-६, सेलेनियम आणि फॉस्फरस अशी खनिजे असतात

दुग्धजन्य पदार्थ-डेअरी उत्पादनात प्रथिने, दह्यामध्ये आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे प्रोबायोटिक्स असतात.

फॉर्टिफाइड सोया दूध आणि सोया दह्यामध्ये चरबीचे प्रमाण अत्यल्प असते

प्रति पाच जणांच्या कुटुंबासाठी किमान पाच ते सहा किलो तेलाची मागणी असते. त्यात चमचणीत किंवा मासांहार खाणाऱ्या कुटुंबाकडून सात किलो तेल खरेदी केले जाते. सध्या महागाई वाढली, बेकरीसाठीची खरेदी कमी असली, तरी घरगुती ग्राहक मात्र डब्यापेक्षा किलोच्या पॅकिंगमधून खरेदी सुरूच ठेवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com