पाणी पुरवठ्यावेळी वादावादी; महिलेचा ब्रेनहॅमरेजने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सांगली: टॅंकरने पाणी पुरवठ्यावेळी वादावादी झाली. तिला ब्रेन हॅमरेज झाले. त्यात तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. येथील शामरावनगरमधील जहिर मशिद परिसरातील महिला जीवानिशी गेली. अफिया शकील मिरजे (वय 26) असे तिचे नाव आहे. सोमवारपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. आज (गुरुवार) पहाटे खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. महापालिकेच्या कारभाराचा हा परिणाम आहे, अशी भावना रहिवाशांतून व्यक्त होत आहे.

शामरावनगरातील ड्रेनेज योजनेच्या कामादरम्यान खोदाईवेळी पिण्याची पाण्याची वाहिनी फुटली. त्यामुळे वीस दिवसांपासून सद्‌गुरु, सुंदर, श्रीराम, ज्येष्ठराज, शिवशक्ती, विठ्ठल, मॉडर्न, ज्ञानेश्‍वर, जहिरा मशिद आदी कॉलन्यांत पाण्याची टंचाई आहे. तात्पुरता उपाय म्हणून रोज दोन टॅंकरने पाणी पुरवठा सुरू होता. टॅंकर आला, की पाण्यासाठी झुंब्बड उडे. सोमवारी असाच प्रकार घडला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रॅंकर आल्यानंतर महिलांची पाणी मिळवण्यासाठी गर्दी झाली. पाणी मिळवण्यावरून गदारोळ उठला. महिलांतील वाद विकोपाला गेला. त्यावेळी निर्माण झालेल्या तणावातून अफिया यांना अचानक चक्कर आली. त्यांना सिव्हिल रुग्णालय आणि नंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला.

स्थानिक नागरिक संदीप दळवी म्हणाले, "हा पालिकेच्या कारभाराचा परिणाम आहे. एका महिला पाण्यासाठी जीवानिशी गेली. अधिकाऱ्यांनी मनात आणले तर ही नादुरुस्त पाईपलाईन तासात दुरूस्त होऊ शकते. मात्र ड्रेनेज ठेकेदाराने ती दुरुस्त करावी, असा हेका प्रशासनाने धरल्याने काम रेंगाळले. दोन विभागांच्या वादात नागरिकांचे हाल सुरु आहेत. आम्ही नागरिक याचा जाब महासभेवेळी महापौर व आयुक्तांना विचारू. एका महिलेच्या मृत्यूने साऱ्या कुटुंबावर आघात झाला आहे. त्यांना महापालिकेने आर्थिक स्वरूपात भरपाई द्यावी.'

Web Title: sangli water issue: Woman dies of Brainhamorge