जिल्ह्यात डझनभर काटा लढती 

sangli-zp
sangli-zp

सांगली - निवडणूक म्हटली की चुरस आलीच. यावेळी निवडणुकीत पक्ष आणि आघाड्यांची संख्या वाढल्यांमुळे बंडखोरांची संख्या मर्यादित राहिली आहे. प्रत्येक गट आणि गणात चुरस ठरलेली असते. झेडपीपेक्षाही पंचायत समित्यांसाठी डझनभर काटा लढती आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्यातील राजकीय मंडळीची नजर आहे. नेत्यांची मुलं, नातेवाईक यांचाही भरणा मोठा आहे. १३ फेब्रुवारीला माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा, विधानसभा, झेडपी, पंचायत समिती आणि त्यानंतर गावपातळीवरील ग्रामपंचायतींच्या  निवडणुका होतात. त्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका फार चुरशीने होतात. प्रत्येक मिनिटामिनिटाला राजकीय संदर्भ बदलतात. यंदाच्या झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. एखाद्या पक्षाने उमेदवारीला नकार दिला की लगेच दुसऱ्या पक्षांचा एबी फॉर्म तयार असतो, हे चित्र पाहायला मिळते आहे. बिग फाईट असलेल्या गट आणि गणांतीलच नव्हे तर दहा टक्के ठिकाणचे विजय काही मतांवर आले आहेत. बिग फाईट असलेल्या ठिकाणी तर अत्यंत चुरस पाहायला मिळते. झेडपीसाठी ३ लाख आणि पंचायत समित्यांसाठी दोन लाख रुपयांची खर्चाची मर्यादा खरे तर एक दिवशीच्या जेवणावळीलाही पुरेशी नाही. तरीही उमेदवार शासनाने घालून दिलेल्या नियमात खर्च दाखवून रिकामे होतात. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे फोनवरील संभाषण जर निवडणूक आयोगाने विचारात घेतले तर त्याने किती खर्च केला, याचा अंदाज घेणे सोपे होईल. 

जिल्ह्यातील काट्याची टक्‍कर
 झेडपी गट
 बागणी ( ता. वाळवा)- कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत ( विकास आघाडी) व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव ( राष्ट्रवादी).
 मांगले ( ता. शिराळा)- माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्‍विनी (राष्ट्रवादी) व झेडपीचे माजी सभापती उदयसिंग नाईक यांच्या स्नुषा अनन्या ( भाजप)

 कुंडल ( ता. पलूस)- आमदार पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड ( काँग्रेस) व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचे पुत्र शरद ( राष्ट्रवादी)  खरसुंडी ( ता. आटपाडी) झेडपीचे माजी उपाध्यक्ष मोहनराव भोसले यांचे पुत्र जयदीप भोसले व भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर.

 नागेवाडी ( ता. खानापूर) आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास ( शिवसेना) व माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पुत्र विशाल ( काँग्रेस) उमदी ( ता. जत)- झेडपीच्या माजी अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर यांचे बंधू ॲड. चन्नाप्पा होर्तीकर ( राष्ट्रवादी) व जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रमसिंह सावंत ( काँग्रेस).


 बोरगाव (ता. वाळवा)- कृष्णा साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील (काँग्रेस) व राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील (राष्ट्रवादी)

 कवलापूर (ता. मिरज) - झेडपी सदस्य शिवाजी डोंगरे (भाजप) व वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक निवास पाटील ( काँग्रेस).

 कडेपूर (ता. कडेगाव)- जिल्हा बॅंकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख ( भाजप) व सत्यजित यादव (काँग्रेस).

 विसापूर (ता. तासगाव)- झेडपीचे माजी सदस्य सुनील पाटील (भाजप) व अर्जुन पाटील (राष्ट्रवादी).

 गण- 
 वाकुर्डे बुद्रुक ( ता. शिराळा)- आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र सत्यजित ( भाजप) व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुतणे, विद्यमान सभापती सम्राटसिंग नाईक ( राष्ट्रवादी).
 वाळवा- नजीर वलांडकर ( रयत विकास आघाडी) व नेताजी पाटील ( राष्ट्रवादी).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com