सेतूमुळे जोडले दोन जातींसह दिव्यांगांना

सेतूमुळे जोडले दोन जातींसह दिव्यांगांना

सोलापूर - आपली जात स्पष्ट करण्यापासून भारतीय रहिवासी असल्यापर्यंतच्या पुराव्यासाठी प्रत्येकाला प्रमाणपत्र द्यावेच लागते. त्यासाठी ही जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू हे जातीचे अधिकृत लेबल अर्थात प्रमाणपत्र देण्याचे काम करत. मात्र याच सेतू कार्यालयाने जाती दाखविण्याऐवजी दोन जातींना व दिव्यांगाना आयुष्यभर जोडण्याचे काम केले आहे, असे म्हटल्यास तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतूने हा सेतू जोडलाय. 

संजय नरसप्पा चलवादी आणि सुरेखा रामचंद्र लोकम असे या आंतरजातीय दांपत्याला रेशीमगाठी बांधण्याचे निमित्त ठरलय सोलापुरातील हे सेतू कार्यालय. त्याला प्रोत्साहित केले यशदा युवती व महिला फौंडेशनच्या अध्यक्ष नगरसेविका फिरदोस पटेल यांनी. 

संजय चलवादी दीड दोन वर्षाचे असताना त्यांना गोवर झाला, त्यावर घरगुती उपचार करण्यासाठी घरच्यांनी त्यांच्या अंगावर एक पावडर लावली. मात्र त्याच्यामुळे डोळ्यांच्या नसांवर परिणाम झाला व त्याचे डोळे बंद झाले ते अद्याप उघडलेच नाहीत. त्याने जिद्दीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यानी अखेर सेतू येथे नागरिकांना अर्ज भरून देण्याचे काम सुरू केले. तिथेच त्यांची सुरेखा यांच्याशी भेट झाली. सुरेखा यांची कहाणीही यापेक्षा वेगळी नाही. लहानपणी पोलिओमुळे त्यांना एका पायाने अपंगत्व आले मात्र मनाचा सुदृढ पणाने त्यानी प्रत्येक परिस्थितीवर मात केली. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर घरच्या गरिबीमुळे त्यानी सेतूमध्ये नागरिकांना विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचे अर्ज भरून देण्याचे काम सुरू केले. संजय यांना अंधत्वामुळे अर्ज भरून देता येत नव्हते, त्यामुळे सुरेखा त्यांना अर्ज भरून देण्यास मदत करायच्या. संजय यांनी त्यांच्या अंधत्वामुळे लग्नाचा विचारच कधी केला नाही, तर सुरेखा यांच्या अपंगत्वामुळे अनेक चांगल्या स्थळांकडून होकार येत नव्हता. तर ज्यांच्याकडून यायचा ते स्थळ चांगले नसायचे. त्यामुळे अखेर सुरेखा यांनीच संजय यांच्याशी विवाह करण्याची इच्छा संजय यांच्या मित्रांकडे व्यक्त केली. संजयकडून पहिल्यांदा याला नकार होता मात्र सुरेखा यांच्या घरच्यांचा विरोध लग्नानंतर मावळेल या अपेक्षेने अखेर त्यानी विवाह नोंदणी संस्थेत विवाह केला. त्यासाठी ऍड. सरोजिनी तमशेट्टी व ऍड. प्रवीण चलवादी यांनी पुढाकार घेतला. मित्रांच्या उपस्थित हे इंटरकास्ट रजिस्टर मॅरेज झाले. या विवाहासाठी नॅशनल ब्लाइंड असोसिएशन व यशदा युवती व महिला फौंउडेशनच्या वतीने मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. 

सोलापूरकरांना निमंत्रण : फिरदोस पटेल 
जातीच्या पलीकडे जाऊन व शारीरिक व्यंगत्वाला नमवून या नवदांपत्यानी जो आदर्श समाजासमोर ठेवला त्याच्या कौतुकासाठी यशदा युवती व महिला फाउंडेशनच्या वतीने सोमवारी (ता. 27) सायंकाळी 7 वाजता ऑफिसर क्‍लब समोरील इंपिरिअल पॅलेस (पोलिस कमिशनर बंगल्यासमोर) येथे स्वागत होणार आहे. या समारंभास उपस्थितीत राहून खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाचे शिलेदार व्हावे. त्यासाठी सर्व सोलापूरकरांनी यावे व समाजापुढे नवीन आदर्श मांडणाऱ्या दांपत्याला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com