मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हैसाळ, टेंभूचा विस्तार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सांगली - म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारित कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. 31) ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे होणार आहे. यानिमित्त जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

सांगली - म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारित कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. 31) ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे होणार आहे. यानिमित्त जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,""ढालगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर दुपारी 12 वाजता मेळावा होईल. त्यात विविध कामांचे भूमिपूजन होणार आहे. कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील कामांचा प्रारंभ यावेळी केला जाणार आहे. त्यात अंकले व खलाटी उपसा गृहाचे उद्‌घाटन होईल. यासोबतच कवठेमहांकाळ तालुक्‍यात टेंभूच्या विस्तारित कामांचे भूमिपूजन आहे. त्यात ढालगाव वितरिका महत्त्वाची असून कदमवाडी, चारोची, दुधेभावी, चुडेखिंडी, जांभूळवाडी, ढोलेवाडी, निमज आदी गावांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यात भूडचे भूमिपूजन होईल. त्यासाठी आमदार अनिल बाबर यांनीही प्रयत्न केले. खानापूर आणि तासगावमधील गावांचा त्यात समावेश आहे. त्याची तांत्रिक बाजू पूर्ण झाली असून मंजुरी मिळेल. टेंभूच्या विस्तारासाठी नाबार्डकडून 200 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 125 कोटी रुपये तातडीने मिळणार आहेत.'' 

घोरपडे पक्षाशी अप्रामाणिक 
कवठेमहांकाळ तालुक्‍यातील भाजप नेते अजितराव घोरपडे यांना या मेळाव्यासाठी बोलवणार नाही, असे संजय पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले. ते म्हणाले,""घोरपडे भाजपशी अप्रामाणिक आहेत. त्यांनी सातत्याने राष्ट्रवादीशी सोयीचे राजकारण केले आहे. आम्हाला तसले चालणार नाही. त्यामुळे मी त्यांना कार्यक्रमाला बोलवणार नाही. भविष्यात त्यांनी काय करायचे, हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या अप्रामाणिकपणाबद्दल पक्षाने काय करायचे हा पक्षाचा विषय आहे, मात्र आम्हाला ते चालणार नाहीत.'' 

जयंतराव... आल्यावर बघू ! 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे, त्याविषयी खासदार पाटील यांनी थेट उत्तर टाळले. ते म्हणाले,""दादांना नेमकं काय म्हणायचं होतं कळालं नाही. माझ्याशी या विषयावर कुठली चर्चा नाही. जयंतराव पक्षात आले तर काय? हा जर-तरचा मुद्दा आहे. ते नंतर बघू.''

Web Title: sanjay patil press press conference