सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीवराजे नाईक निंबाळकर व उपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (मंगळवार) दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषदेचे सभागृहात जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल (निवडणूक निर्णय अधिकारी) यांच्या उपस्थित या निवडी झाल्या. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करून गुलालाची उधळण केली.

संजीवराजे हे पाचव्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. ते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू आहेत. वसंतराव मानकुमरे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थक मानले जातात. त्यांच्या रूपाने जावली तालुक्‍याला प्रथमच उपाध्यक्षपद मिळाले आहे.

Web Title: sanjeevraje naik nimbalkar selected as satara zp chairman