संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला अठरा जूनला सुरुवात

किरण चव्हाण  
सोमवार, 4 जून 2018

माढा (सोलापूर ) -  पंढरपूरच्या आषाढी वारीत मानाचे स्थान असणाऱ्या श्री. क्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईंचा आषाढी वारीसाठीचा पालखी सोहळा सोमवारी (18 जून ) मुक्ताईनगर येथील समाधीस्थळारून प्रस्थान करणार असून, यंदा हरित वारीचा उपक्रम पालखी सोहळयाच्या आयोजकांनी हाती घेतला आहे. प्लास्टिकचा वापर टाळून यंदा निर्मल वारी, हरीत वारीचा संदेश दिला जाणार आहे. वारकऱ्यांजवळ बिया देवून पालखी मार्गावर वृक्षारोपणाचा संदेशही दिला जाणार असल्याचे सोहळाप्रमुख ह. भ. प. रविंद्र महाराज हरणे यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले. 

आठरा जूनला सकाळी दहा वाजता जुने मुक्ताबाई मंदिरातून विधीवत पादूका पूजन करून हजारो वारकऱ्यांसह पालखी सोहळा पंढपूरकडे प्रस्थान करणार आहे. 

जून महिन्यातील पालखी मुक्कामाची ठिकाणे - 
सातोड (ता.18 ), भालेगाव - रण (ता.19), मलकापूर (ता. 20), शेलापूर (ता. 21), टाकरखेड (ता. 22), मोताळा (ता. 23), बुलढाणा (ता. 24), येळगाव (ता. 25), चिखली (ता. 26), खंडाळा मकरध्वज (ता. 27), मेरा बु, (ता. 28), भरोसा (ता. 29), देऊळगाव मही (ता.30) 

जुलै महिन्यातील पालखीच्या मुक्कामाची ठिकाणे - 
देऊळगाव राजा (ता. 1),  कन्हैयानगर - जालना (ता.2), काजळाफाटा (ता. 3), अंबड (ता. 4), वडी गोद्री (ता. 5), पाथरवाला बु. (ता. 6), गेवराई (ता. 7), नामलगाव फाटा (ता. 8),  बीड माळीवेस (ता. 9), बीड बालाजी मंदिर (ता. 10), पाली (ता. 11), मोरगाव (ता. 12), चैासाळा (ता. 13), वाकवड (ता. 14), भूम (ता. 15), जवळा नीजाम (ता. 16), शेंद्री (ता. 17), माढा (ता. 18), आष्टी (ता. 19),  पंढरपूर (ता. 20)

पालखी सोहळयाची वैशिष्टये -
वारीदरम्यान जेवण व चहापाण्यासाठी सर्रास प्लास्टिकचा वापर होतो. अन्नदातेही प्लास्टिकचा वापर करतात. यंदा निर्मल वारी हरित वारीचा संदेश देत वारकऱ्यांना प्लासटिक वस्तूचा वापर करायचा नाही असा संदेश देण्यात आला आहे. यासाठी वारकरी भोजनासाठी ताट, वाटी, तांब्या, कप स्वतःचा वापरणार आहेत. 

वारकऱ्यांसोबत विविध झाडांच्या फळांच्या बिया दिल्या जाणार आहेत. या बिया पालखी मार्गावरील वृक्षारोपणासाठी वापरल्या जाणार आहेत. यातून हरित वारीचा संदेश दिला जाणार आहे. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्हयातून पालखी सोहळा प्रवास करतो. 34 दिवसांचा मुक्कामात साडेसातशे किलोमीटरचा प्रवास पालखी सोहळा करणार आहे. तीनशे नऊ वर्षाची पालखी सोहळयाला परंपरा आहे.

Web Title: sant muktabai palkhi sohola will starts from 18 june