सातारा: काँग्रेसची घसरगुंडी, भाजपचा टक्का वाढला! 

Ashok Chavan Devendra Fadnavis
Ashok Chavan Devendra Fadnavis

सातारा : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची मते घटून ती भाजपच्या वाट्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची मते अडीच हजारांनी वाढली तर पंचायत समितीत 16 हजारांनी कमी झाली आहेत. काँग्रेसला गेल्या (2012) जिल्हा परिषद निवडणुकीत चार लाख 64 हजार 709 मते मिळाली होती तर यावेळेस केवळ दोन लाख 66 हजार 357 मते मिळाली आहेत. एक लाख 98 हजार 352 मतांची कपात झाली आहे. भारतीय जनता पक्षाला दोन लाख 12 हजार 760 मते मिळाली असून एकूण मतांच्या 10.82 टक्के मते मिळाली आहेत. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात 19 लाख 66 हजार 059 मतदार होते. 13 लाख 36 हजार 920 मतदान झाले. याची टक्केवारी 68 होती. निकालात राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत 39 जिंकत निर्विवाद सत्ता मिळविली. तर काँग्रेस व भाजपला सात जागा मिळाल्या. या निवडणुकीत पक्षनिहाय मतांची टक्केवारी लक्षात घेता जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला पाच लाख 58 हजार 985 मते मिळाली. काँग्रेसला दोन लाख 66 हजार 357, भाजपला दोन लाख 12 हजार 760, शिवसेनेला एक लाख 721 तर अपक्ष व आघाडींना दोन लाख पाच हजार 98 मते मिळाली. 

2012 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाच लाख 56 हजार 448 मते मिळाली होती. काँग्रेसला चार लाख 64 हजार 709, महायुती (भाजप, शिवसेना, रिपाई) 96 हजार 366 मते तर अपक्ष व आघाडींना एक लाख 52 हजार 586 मते मिळाली होती. 
पंचायत समितींच्या निवडणुकीत यावेळेस राष्ट्रवादीला पाच लाख 29 हजार 840, काँग्रेसला दोन लाख 78 हजार 197, भाजपला दोन लाख 41 हजार 817, शिवसेनेला एक लाख 15 हजार 713 तर अपक्ष व आघाडींना दोन लाख आठ हजार 349 मते मिळाली आहेत. 2012 च्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला पाच लाख 46 हजार एक, काँग्रेसला चार लाख 56 हजार 415, महायुतीला 96 हजार 329 तर अपक्ष आणि आघाडींना एक लाख 76 हजार 619 मते मिळाली होती. 

पक्षनिहाय मतांची टक्केवारी 

  • जिल्हा परिषद : राष्ट्रवादी : 29.43, काँग्रेस : 13.54, भाजप : 10.82, शिवसेना : 5.12, अपक्ष व आघाडी : 10.44. 
  • पंचायत समिती : राष्ट्रवादी 26.94, काँग्रेस 14.15, भाजप 12.29, शिवसेना 5.88, अपक्ष व आघाडी : 10.59. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com