सातारा : विजेच्या तारेला चिटकून दाम्पत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मतकर मळा निंबळक येथील नागरिकांनी पालखी तळ येथील तुटलेल्या तारांची माहिती महावितरण विभागाला दोन दिवसांपूर्वी दिली होती. परंतु महावितरणच्या याकडे दुर्लक्ष केले.

निंबळक : सातारा जिल्ह्यातील वाजेगाव येथे येथे विजेच्या तारेला चिकटून दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आज (शनिवार) सकाळी ८ वाजता ही घटना घडली. दीपक रत्नसिंह मतकर (वय ३५) आणि योगिता दीपक मतकर (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत.

मतकर मळा निंबळक येथील नागरिकांनी पालखी तळ येथील तुटलेल्या तारांची माहिती महावितरण विभागाला दोन दिवसांपूर्वी दिली होती. परंतु महावितरणच्या याकडे दुर्लक्ष केले. महावितरणच्या दुर्लक्षामुळे या दांपत्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :