सोमंथळीचा पूल वाहून गेल्याने फलटण-बारामती वाहतूक बंद

संदीप कदम
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मंडलनिहाय तालुक्यात पडलेला पाऊस
फलटण - १०५ मिमी, आसू- ४२ मिमी, बरड- ५२ मिमी, तरडगाव -१५ मिमी, आदर्की -२२ मिमी, गिरवी- १२ मिमी, राजाळे - ६० मिमी, होळ - २१ मिमी, वाटार निंबाळकर- ५५ मिमी असा नोंद करण्यात आला.

फलटण (जि. सातारा) : सोमंथळी येथील फलटण - बारामती महामार्गावरील पुलाच्या अर्धवट कामामुळे ओढ्यातून काढण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईप्स वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सायंकाळी सुरू झालेल्या वादळी पावसाने परिसर झोडपून काढला. यावेळी सोमंथळी येथील मुख्य रस्त्यावरील पर्यायी कच्चा पूल रात्रीच्या सुमारास वाहून गेला.
या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळावर पोलीस निरीक्षक शेळके, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांनी रात्री तेथे थांबून कोणत्याही प्रकार अपघात घडूनये यासाठी सदरचा रस्ता वाहतूकी साठीबंद केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :