बामणोलीत आढळला जगातील दुर्मिळ पतंग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सातारा - जगातील सर्वांत मोठा दुर्मिळ पतंग बामणोली परिसरात नुकताच आढळून आला आहे. या पतंगाच्या पंखांची लांबी साधारण एक फुटापर्यंत आहे. त्याच्या वावरामुळे बामणोली परिसर जैवविविधता संपन्न असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

"ऍटॅकस ऍटलस मॉथ' असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. नर पतंगाचा पंख उघडल्यावर साधारण आकार 25 ते 30 सेंटीमीटर, म्हणजे साधारण एक फूट इतका असतो. उष्ण रंगसंगतीच्या पंखावर असलेले उजळ ठिपके, त्याला असलेली गडद काळी किनार यामुळे तो अधिक आकर्षक दिसतो. त्याचं झालं असं, साताऱ्यातील पर्यावरणप्रेमी व कलावंत गणेश ढाणे नुकतेच बामणोली परिसरात भटकंतीला गेले होते. बाळू शिंदे हा स्थनिक युवक त्यांच्यासोबत होता. या दोघांना भटकंती करत असताना मोठा व वैशिष्ट्यूपूर्ण पतंग आढळून आला. पश्‍चिम घाटावर क्वचितच आढळणाऱ्या या पतंगाचे वास्तव्य असणारे ठिकाण जैवविविधता संपन्न म्हणून ओळखले जाते. असा हा भाग भविष्यात अतिसंवेदनशील जैविविधतेचा प्रदेश "मेगा हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी एरिया' म्हणून ओळखला जाऊ शकतो.