चितळी येथील दारुचे दुकान बंद; गावासाठी भिमराव पवार यांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सातारा : खटाव तालुक्यातील चितळी येथील सरकारमान्य देशी दारुचे दुकान स्वत:हून बंद करण्याचा निर्णय मालक भिमराव शंकर पवार (काका) यांनी घेतला असून, गुरुवार पासून हे दुकान बंद करण्यात आले आहे.

सातारा : खटाव तालुक्यातील चितळी येथील सरकारमान्य देशी दारुचे दुकान स्वत:हून बंद करण्याचा निर्णय मालक भिमराव शंकर पवार (काका) यांनी घेतला असून, गुरुवार पासून हे दुकान बंद करण्यात आले आहे.

या संदर्भात पवार यांनी गुरुवार दुपारी सातारा येथील उत्पादनशुल्क विभागाच्या कार्यालयात रितसर अर्ज दिला. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, चितळी येथे माझ्या मालकीचे सरकारमान्य देशी दारुचे दुकान आहे. मी गेल्या 30 वर्षापासून हा व्यवसाय करीत आहे. गावाने मला व माझ्याकुटुबियांना भरभरुन प्रेम दिेले. या गावचा रहिवासी असल्याचा मला अभिमान आहे. गावच्या भल्याचा विचार करुन मी स्वत:हून माझ्या मालकीचे दारुचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादनशुल्क खात्याला रितसर अर्ज दिला आहे. व दुकान आजपासूनच बंद केले आहे.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या :