"बीएसएनएल'ची रिलायन्सच्या "जियो'वर मात! 

"बीएसएनएल'ची रिलायन्सच्या "जियो'वर मात! 

सातारा - "बीएसएनएल'ने "रिलायन्स जिओ'च्या 4 जी वर मात करणारा प्लॅन बाजारात आणला असून, त्यात ग्राहकांना 429 रुपयांत तीन महिन्यांसाठी कोणत्या ही नेटवर्कमध्ये अमर्याद कॉल्स करण्याची सुविधा तसेच इंटरनेट युजर्ससाठी दररोज एक जीबी डेटा मिळणार आहे. 

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात "रिलायन्स जिओ'च्या 4 जी सेवेच्या आगमनाने बीएसएनएल या सरकारी कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा फटका बसला. याचे प्रमुख कारण म्हणजे रिलायन्सने वेगवेगळ्या ऑफर्सखाली ग्राहकांना मोफत भरघोस सुविधा पुरविल्या. परंतु, रिलायन्सने अलीकडेच आपल्या सेवेच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक पुन्हा अन्य कंपन्यांकडे वळू लागले आहेत. हे ग्राहक मिळविण्यासाठी बीएसएनएलने पोर्ट-इन करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी रुपये 429 हा विशेष प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्याद कॉल्स करण्याची सुविधा तसेच इंटरनेट युजर्ससाठी दररोज एक जीबी डेटा याचा लाभ मिळणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात "रिलायन्स जिओ'च्या 4 जी सेवेचे आगमन झाले. त्यात रिलायन्सने वेलकम, हॅप्पी न्यू इयर या ऑफर्सखाली सहा महिने अमर्यादित कॉल्स, इंटरनेट उपलब्ध करून दिले आणि कॉल करण्यासाठी पैसे लागणार नाहीत असे जाहीर केले. त्यामुळे अन्य कंपन्यांचे ग्राहक रिलायन्सकडे मोठ्या संख्येने वळाले. परंतु, रिलायन्स जिओने अलीकडेच आपल्या सेवेच्या दरात वाढ केली आहे. या परिस्थितीत रिलायन्सचे ग्राहक आपली मोबाईल सेवा बंद करू लागले. रिलायन्सचा संबंधित ग्राहक बीएसएनएलकडे वळविण्यासाठी कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक ग्राहक केंद्रात रिलायन्स कॉमचे मोबाईल सेवा बंद झालेल्या ग्राहकांना पोर्ट इन करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी रुपये 429 विशेष प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्याद कॉल्स करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच इंटरनेट युजर्ससाठी दररोज एक जीबी डेटाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांचा दुहेरी फायदा होत आहे. 

इन्फोबीएसएनएलचे ग्राहक होण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. कोणताही मोबाईल ग्राहक आपला मोबाईल क्रमांक लिहून 1900 वर एस. एम. एस. पाठवून बीएसएनएलचे ग्राहक होऊ शकतात. यानंतर त्या ग्राहकांनी जवळच्या बीएसएनएलच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आधार क्रमांकाची माहिती देणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com