कोयनेच्या पात्राजवळ आढळली 5 फूट लांबीची मगर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

ग्रामस्थांनी संबंधित मगरीची वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

कराड : पाटण तालुक्यातील नेरळे - चेवलेवाडी येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांना तेथील कोयना नदीपात्राजवळच असलेल्या एका ओढ्यामध्ये सुमारे 5 फूट लांबीची मगर आज रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास आढळून आली.

तेथील ग्रामस्थांनी धाडसाने रस्सीच्या सहाय्याने या मगरीस बांधून बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी बांधून ठेवली आहे. ग्रामस्थांनी संबंधित मगरीची वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

त्या परिसरात यापूर्वी अनेकदा मगरीचे दर्शन झाले होते, पण आज प्रत्यक्षात मगर पकडल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. या प्रकाराने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​