खंबाटकी घाटात आढळला तरुणाचा बेवारस मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

घाटातील दत्तमंदीराच्या पुर्वेकडील दरीत कुजट व सडलेला वास आल्याने घाटातील कठड्यावरुन पाहिले असता अतिशय  सडलेल्या व तेलकट अवस्थेतील अंदाजे 30 ते 35 वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह आढळुन आला

खंडाळा - पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील मध्यावर असणाऱ्या दत्तमंदीराच्या पुर्वेस आज दुपारी एक बेवारस मृतदेह आढळुन आला. या मृतदेहाची जागेवरच शवविच्छेदन करुन खंडाळा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली.

या घटनेतील फिर्यादी क्रेनचालक अजित सलीम मुलाणी.रा.खंडाळा हा आपली क्रेन घेऊन खंबाटकी  घाटातुन जात असाताना घाटातील दत्तमंदीराच्या पुर्वेकडील दरीत कुजट व सडलेला वास आल्याने घाटातील कठड्यावरुन पाहिले असता अतिशय  सडलेल्या व तेलकट अवस्थेतील अंदाजे 30 ते 35 वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह आढळुन आला. यानंतर खंडाळा पोलीसांनी मृतदेहाची अवस्था पाहुन जागेवरच शवविच्छेदन केले.

घाटातील दरीत दिसून आलेल्या या मृतदेहावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पुढील तपास पोलीस नितीन नलवडे करीत आहे.

Web Title: satara news: dead body located