कऱ्हाड: गोळीबार करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला काही तासात अटक

karhad
karhad

कऱ्हाड : हवेत गोळीबार करून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला दरोड्यानंतर अवघ्या काही तासात अटक करण्यात आली. शहर व तालुका पोलिसांच्या सयुंक्त कारवाईत दरोडेखोरांची टोळी गजाआड झाली. त्यांच्याकडून 30 हजांराची रोकड, पिस्तल, चाकू, तलवार व दोन बुलेट जप्त झाल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस उपाधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव, अशोक क्षीरसागर, सहायक पोलिस निरिक्षक नितीन साबळे, फोजदार अऩिल चौधरी व तपासातील त्यांचे सहकारी उपस्थीत होते. पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, हवेत गोळीबार करणाऱ्या व पेट्रोलपंप लुटणाऱ्या सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील पाच लोकांना अटक आहे. अन्य एक संशयीत अल्पवयीन आहे. अटक केलेल्यापैकी चौघेजण हरीयाणा येथील आहेत.

इश्वर राजकुमार सैनी (वय 21), महेंद्र सुर्यग्यान गुजर (20), दीपक राजकुमार गर्ग (25), अनमोल जीवनसिंग शर्मा (22, चौघे रा. हरियाणा), अक्षय भरत कावरे (21, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) अशी त्यांची आहेत. अन्य एक अल्पवयीन आहे. संबधितांनी वडगाव हवेली येथील दत्त पेट्रोलपंप लुटला. त्यावेळी ते दोन दुचाकीवरून तिबलशीट आले होते. त्यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केला. तेथे असलेल्या सगळ्यांना केबीन मध्ये घेवून डांबून ठेवले व तेथून सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल घेवून ते कडेगाव मारेग पळाले. त्यानंतर ते सोनसळ घाटातून कडेगाव व पुन्हा कऱ्हाडकडे येत असताना त्यांना कॅनॅालवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी पकडले. त्यापूर्वी दरोड्याची माहिती जिल्हाभर गेली होती. त्याच्या नाकाबंदीसाठी तालुका व शहर पोलिसांची पथकेही रवाना झाली होती. पोलिस उपाधीक्षक सौ. शिवणकर, पोलिस निरिक्षक क्षीरसागर, जाधव यांनीही प्रयत्न केले होते. त्यावेळी ते नाकाबंदीक कृष्णा कॅनॅाल येथे सापडले.

त्यांच्याकडून पाच मोबाईल, एक पिस्तल, दोन तलवारी, एख चाकू, दोन बुलेट, एक डिलक्स दुचाकी जप्त करण्यात आली आहे. लुटीतील रक्कमही जप्त केली आहे. ते य़ेतील एका लॉजवर राहत होते. तेथेही रात्री छापा टाकला. त्यावेळी त्यांचे अन्य साहित्यही येथून जप्त करण्यात आले आहे. कारवाईत शहर व तालुका पोलिसांनी संयुक्त सहभाग घेतला. विट्याहून भरधाव येणाऱ्या दुचाकीला येथील कृष्णा कॅनॉल चौकात शहर पोलिस ठाण्यातील हवालदार गणेश देशमुख व श्री. मोहिते व श्री. गुरव बंदोबस्तास होते. त्यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी मोठ्या शिताफीने त्यांना अडवले. विट्याकडून दोन दुचाकीवर पाच संशयीत भरधाव येत आहेत, याची माहिती त्यांना कंट्रोलकडून मिळाली होती. त्यामुळे ते त्यांना अडवण्याच्या तयारीत होते. त्यांनी दोन दुचाकीवरील पाचजणांना अडवले. त्यावेळी त्यांनी उडाव उडीवीची उत्तरे दिली. मात्र त्यांच्याकडे चौकशी केली अशता त्यांना एक पिस्तल, आठ जीवंत काडतुसे, 30 हजारांची रोख रक्कम व पाच मोबाईल सापडले. त्यांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर देशमुख यांनी त्याची माहिती वरिष्ठांना दिली व त्यानंतर पुढचा सारा प्रखार उघडकीस येम्यास मदत झाली. ते ज्या लॉजवर थांबले होते. तेथूनही काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com