कऱ्हाड: दरोडेखोरांना शहरातून नेले चालवत

सचिन शिंदे
रविवार, 13 ऑगस्ट 2017

शहर व तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत झाली. दरोडेखोरांची टोळीकडून 30 हजांराची रोकड, पिस्तल, चाकू, तलवार व दोन बुलेट जप्त केली आहे. अटकेतील चौघेजण हरियाना येथील आहेत. इश्वर राजकुमार सैनी (वय 21), महेंद्र सुर्यग्यान गुजर (20), दीपक राजकुमार गर्ग (25), अनमोल जीवनसिंग शर्मा (22, चौघे रा. हरियाणा), अक्षय भरत कावरे (21, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) अशी त्यांची आहेत.

कऱ्हाड : हवेत गोळीबार करून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी वाहन ना दुरूस्त झाल्याने शहरातून चालवत न्यायालयात नेले. दरोड्यानंतर अवघ्या काही तासात काल या टोळीला अटक करण्यात आली होती.

शहर व तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत झाली. दरोडेखोरांची टोळीकडून 30 हजांराची रोकड, पिस्तल, चाकू, तलवार व दोन बुलेट जप्त केली आहे. अटकेतील चौघेजण हरियाना येथील आहेत. इश्वर राजकुमार सैनी (वय 21), महेंद्र सुर्यग्यान गुजर (20), दीपक राजकुमार गर्ग (25), अनमोल जीवनसिंग शर्मा (22, चौघे रा. हरियाणा), अक्षय भरत कावरे (21, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) अशी त्यांची आहेत. अन्य एक अल्पवयीन आहे. संबधितांनी वडगाव हवेली येथील दत्त पेट्रोलपंप लुटला. त्यावेळी ते दोन दुचाकीवरून आले होते. त्यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केला. लूटीनंतर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत ते सापडले.

आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यांना न्यायालयात नेण्यासाठी बाहेर आणले त्यावेळी पोलिसांचे वाहन पंक्चर असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यावेळी जवळच असलेल्या फौजदारी न्यायालयात त्यांना चालवत नेले. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. अनेकजण फोटो काढत होते. संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यांना पोलिस ठाण्यात नेताना वाहनातून नेण्यात आले. त्यावेळी वाहन दुरूस्त होवून आले होते.

टॅग्स