शिक्षणमंत्री तावडेंवर बुक्का टाकण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

विनोद तावडे मुर्दाबाद अशा घोषणाही येथे देण्यात आल्या.

सातारा : मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मारुती जानकर यांनी आक्रमक होत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर अबीर बुक्का टाकण्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे या मागण्यांसाठी त्यांनी तावडे यांच्यावर बुक्का टाकला. 

येथील सयाजीराव विद्यालय येथे हा प्रकार घडला. तावडे हे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती कार्यक्रमासाठी सातारामध्ये आले आहेत. विनोद तावडे मुर्दाबाद अशा घोषणाही येथे देण्यात आल्या. या प्रसंगी पोलिसांनी तत्परता दाखवत जानकर यांना ताब्यात घेतले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :