इको फ्रेंडली गणेशमूर्तींची उद्या कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सातारा - सकाळ एनआयई, रोटरी क्‍लब, रोट्रॅक्‍ट व इनरव्हील क्‍लब ऑफ सातारा कॅम्प यांच्या वतीने रविवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ वाजता करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम वाढावे, त्यांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांनी घरोघरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, शाडू मातीपासून विद्यार्थ्यांनी सुबक गणेशमूर्ती बनवाव्यात हाही या कार्यशाळेचा हेतू आहे. कार्यशाळेत योगिता धुमाळ या कला शिक्षिका विद्यार्थ्यांना शाडूपासून मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.

या कार्यशाळेसाठी रोटरी क्‍लब ऑफ कॅम्प साताराचे अध्यक्ष अमित कदम, सचिव अतुल वनारसे, सुप्रिया प्रभुणे, संदीप कणसे, नरेंद्र शेलार, रोट्रॅक्‍ट अध्यक्ष सतीश डोके, अमर चव्हाण, तसेच ‘इनरव्हील’च्या अध्यक्षा सीमा मुथा, सचिव गीता मामणिया यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा होणार आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे
 विद्यार्थ्यांनी बरोबर येताना पाण्याची बाटली, नॅपकिन, पुट्टा, एक बाऊल घेऊन यावे
 एनआयई सभासद होण्यासाठी कार्यक्रमस्थळी व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: satara news eco friendly ganesh workshop