सातारा जिल्ह्याला 233 कोटींची कर्जमाफी 

सातारा जिल्ह्याला 233 कोटींची कर्जमाफी 

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख 69 हजार 417 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत 233 कोटी 63 लाख 6 हजार 928 रुपये प्राप्त झाले असून, यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात 181 कोटी 29 लाख प्रत्यक्ष जमा केले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली. 

या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. योजनेच्या गतिमान व अचूक कार्यवाहीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा सहकारी बॅंक व विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्यास मदत झाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची कार्यवाही वेगाने सुरू असून, उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुद्धा बॅंकांच्या माध्यमातून गतीने सुरू आहे. 

कर्जमाफीसाठी टप्प्या- टप्प्याने ग्रीन लिस्ट व कर्जमाफीची रक्कम प्राप्त होत आहे. आतापर्यंत एकूण तीन ग्रीन लिस्टनुसार कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. 

26, 264  - शेतकऱ्यांचे कर्ज माफ 

39, 338  - शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com