पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह

पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह

सातारा - नियोजन समितीच्या निवडणुकीचे वातावरण शांत होतेय तोच गावागावांतील कारभारी ठरविण्यासाठी येत्या सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील सुमारे ३३९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया होत आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आतापासून रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. या वेळेस पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा सर्वांचा आग्रह असल्याने गावोगावी पक्षांची चिन्हे पहिल्यांदाच पाहायला मिळतील. 

नियोजन समितीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्ह्यातील ३३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची गावनिहाय रणनीती ठरविली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीत भाजपशी हात मिळवणी करत राष्ट्रवादीने सर्व विरोधकांना धूळ चारली. त्याचा फायदा भाजपलाही झाला. नियोजन समितीत त्यांचे चार सदस्य आले. आता भाजपच्या नेत्यांचे टार्गेट आगामी ३३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर सहजासहजी होत नाहीत; पण यावेळे सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने सर्वच पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने बहुतांश ग्रामपंचायतीच्या  सत्तेत त्यांचा वाटा आहे; पण काही ठिकाणी राष्ट्रवादीतच दोन गट निर्माण झाले आहेत. काही नेते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. तेथे भाजपला सत्ता मिळविण्यासाठी भाजपमध्ये आलेल्यांचा फायदा होणार आहे. जेथे राष्ट्रवादीतच दोन गट आहेत, तेथे दुसऱ्या गटाला हाताशी धरून भाजप ग्रामपंचायतीत एंट्री मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादीनेही ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुकाही पक्षाच्या चिन्हावर लढण्याबाबत एकमत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपही पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी करणार आहे. त्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होऊन गावनिहाय रणनीती आखली जाणार आहे. त्यामुळे भाजपचे मिशन ग्रामपंचायत इलेक्‍शन असल्याचे चित्र आहे.

सरपंचपदावरच सर्वांचे लक्ष
आतापर्यंत थेट नगराध्यक्ष निवडीत भाजपला वाई व कऱ्हाड नगरपालिकेत फायदा झाला आहे. तोच ट्रेण्ड ग्रामपंचायत निवडणुकीत राखता यावा, यासाठी थेट जनतेतून सरपंच निवडीचा फायदा उठविण्यासाठी भाजपचे नेते तयारी करत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेससह अन्य पक्षांतूनही तशा हालचाली सुरू असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com