ग्रामपंचायत निवडणूकीत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम 
अर्ज दाखल करणे ः 22 ते 29 सप्टेंबर 
छाननी : तीन ऑक्‍टोबर 
अर्ज मागे घेणे : पाच ऑक्‍टोबर 
चिन्ह वाटप व यादी : पाच ऑक्‍टोबर 
मतदान : 16 ऑक्‍टोबर (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच) 
मतमोजणी : 17 ऑक्‍टोबर 

सातारा - जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून (ता. 22) सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून ते आवश्‍यक कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक तहसीलदारांनी कार्यालय किंवा परिसरात अर्ज स्वीकारण्याची सोय केली आहे. 

जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, उद्या (ता. 22) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या वेळेसही ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरून त्यासोबत आवश्‍यक सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक आहे. या ऑनलाइन अर्जाची प्रत काढून ती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांकडे जमा करावीत. ता. 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. सुट्ट्या वगळता सहा दिवसच अर्ज दाखल करण्यासाठी मिळतील. जिल्हा प्रशासनाकडून अर्ज भरण्याबाबत कोणतीच सोय केलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आपापल्या जबाबदारीवर ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. 

Web Title: satara news grampanchayat election online Application