लोकनेतेंचा डिस्टलरी प्रकल्प देशभरात 'स्वराज मॉडेल' म्हणून विकसित होणार

संदिप कदम
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

फलटण (जि. सातारा):  लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याचा महत्वाकांक्षी डिस्टलरी प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून, या प्रकल्पात वापरात येत असलेली आधुनिक यंत्रणा देशभरात सर्व प्रथम स्वराजनेच राबविली असल्याने आगामी काळात हि यंत्रणा 'स्वराज मॉडेल' म्हणून देशाला परिचित होणार आहे. तर आधुनिक यंत्रणेमुळे होणारा फायदा शेतकर्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपळवे (ता. फलटण) येथील लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या डिस्टलरी प्रकल्पाकाबद्दल माहिती देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर आगवणे, डिस्टलरी प्रकल्पाचे जनरल मॅनेजर शिवाजीराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रकल्पात आधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याने अतिरिक्त पाण्याचा वापर टळणार असून पाण्याची मोठी बचत होणार आहे. त्याच बरोबर सांडपाण्याचा पूर्नवापर होणार असल्याने जल प्रदुषणाचा प्रश्न निकाली निघणार आहे. मेकेनिकल व्हेपर रिकॉम्प्रेसर (एम व्ही आर) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम होणार आहे. यामुळे पाण्याची मोठी बचत होणार आहे. या शिवाय या प्रकल्पात 'इन्शनरेशन बॉयलर'चा वापर होणार आहे. यामुळे उत्सर्जनाचे प्रमाण शुन्यावर राहणार आहे व डिस्टलरी वेस्टेजला गट्टा करुन त्याचा वापर इंधन म्हणून केला जाईल व येथील वाफेवर ५ मेगा वॉट विजेची निर्मिती करण्यात येईल. यामधील १.५ मेगा वॉट विजेवर कारखाना चालविला जाईल व उर्वरीत ३.५ मेगा वॉट विजेची विक्री केली जाईल. या प्रकारचा हा जगातील एकमेव प्रकल्प असल्याचे सांगून रणजितसिंह म्हणाले , या प्रकल्पाची क्षमता  कारखान्यातील मळी पासुन प्रती दिन ६० हजार लिटर शुध्द मद्यार्क (रेक्टीफाईड स्पिरीट), जल रहित मद्यार्क (इथेनॉल), अती शुध्द मद्यार्क (इ. एन. ए.) यांची निर्मिती करण्याची राहणार आहे.

या प्रकल्पात वापरण्यात येणारी आधूनिक यंत्रणा सर्व प्रथम आपल्या कारखान्यात वापरणार असल्याने अनेकांना याची उत्सुकता आहे. यामुळे पाण्याचा पुर्न वापर होणार आहे. त्यामुळे पाणी व खर्च याची बचत होणार आहे. आर्थिक बचत झाली तर ती शेतकर्यांसाठी लाभदायक ठरणार असून, शेतकर्यांना त्यामुळे दरवाढ देता येणार असल्याचे यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news hindurao naik nimbalkar sugar factory swaraj model