आंब्यांबरोबरच फणसांचे आगमन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

तारळे - विभागाच्या डोंगरकपारीतील वाडीवस्तीवरून डोंगरी आंब्यांच्या पाट्याच पाट्या येथे दाखल होऊ लागल्या आहेत. 

आंब्यांबरोबरच फणसांचे आगमन झाले आहे. त्यामुळे एक प्रकारचा सुवासिक घमघमाट येथे अनुभवायास येत आहे. तारळ्यात त्यानिमित्ताने ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. 

तारळे - विभागाच्या डोंगरकपारीतील वाडीवस्तीवरून डोंगरी आंब्यांच्या पाट्याच पाट्या येथे दाखल होऊ लागल्या आहेत. 

आंब्यांबरोबरच फणसांचे आगमन झाले आहे. त्यामुळे एक प्रकारचा सुवासिक घमघमाट येथे अनुभवायास येत आहे. तारळ्यात त्यानिमित्ताने ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. 

साधरणतः दर वर्षी 15 मेनंतर येथील स्थानिक आंबा बाजारपेठेत येत असतो. मात्र, या वर्षी थोडा उशीर होउन मे च्या शेवटी शेवटी हा या आंब्यांचे बाजारपेठेत आगमन झाले आहे. नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या डोंगरातील विविध जातींच्या आंब्यांचे आबालवृद्धांना आकर्षण असते. रसाळ व स्वादिष्ट आंब्यांना येथे मोठी मागणी असते. सकाळी सातपासून दुपारपर्यंत हा बाजार भरलेला असतो. समारे 25 ते शंभर रुपये डझन दराने आंबा विक्री होतेय, तर काही शेतकरी हापूस आंबाही विक्रीसाठी आणत असून, त्यास 200 ते 250 रुपये डझन असा दर मिळत आहे. 

फणसही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले असून, मोठाले ढिग पाहायला मिळत आहेत. त्यात काफा जातीच्या फणसाला मोठी मागणी आहे. सकाळी पहिल्या गाडीने डोंगरातील महिला व पुरुष शेतकरी आपल्या आंब्यांच्या पाट्या घेऊन येतात. दुसाळे, बांधवाट, पाबळवाडी, कळंबे, जळव, आंबेवाडी, जुगाईवाडी आदी गावांतून हा आंबा येथील बाजारपेठेत येत आहे. सुटीचा हंगाम सुरू आहे, तसेच पावसाचे आगमन काहीच दिवसांत होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविल्यामुळे आंबा खरेदीसाठी झुंबड उडत आहे. 

डोंगरी कुटुंबांना आर्थिक हातभार 
एकदा पाऊस सुरू झाला, की आंबा खरेदीकडे लोक हमखास पाठ फिरवितात. दर वर्षीच्या अनुभवावरून विक्रेत्यांची धांदल उडाल्याची दिसून येत आहे. त्यामुळे खरेदी विक्रीसाठी विक्रेते व ग्राहकांनी गर्दी केली आहे. या आंबा विक्रीने काही प्रमाणात डोंगरी कुटुंबांना आर्थिक हातभार लागत आहे. 

Web Title: satara news Jackfruit in market

टॅग्स