आदेश बांदेकर यांच्या मोटारीला अपघात

aadesh bandekar
aadesh bandekar

कऱ्हाड (सातारा): पुणे-बंगळूर महामार्गावर कऱ्हाडपासून सात किलोमीटरवरील आटके टप्पा येथे शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या मोटारीला आज (बुधवार) अपघात झाला. बांदेकर सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर काही मिनीटात दुसऱ्या वाहनाने बांदेकर मुंबईकडे रवाना झाले.

बांदेकर मुंबईहून कोल्हापूरला निघाले होते. यावेळी भरधाव ट्रकचा अॅकसेल तुटला. मागून भरधाव असलेली बांदेकर यांची गाडी ट्रकवर जावून आदळली. त्यात गाडीचे पुढील भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने बांदेकरांसह सर्वजण सुरक्षित आहेत. अपघातानंतर काही वेळातच बांदेकर दुसऱ्या वाहनाने कोल्हापूरला रवाना झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com