साताराः लाच मागितल्या प्रकरणी हवालदारास अटक

सचिन शिंदे
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

कऱ्हाड (सातारा): गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करण्यासाठी चार हजाराची लाच मागितल्या प्रकरणी हवालदारास आज (बुधवार) येथे अटक झाली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तालुका पोलिस ठाण्यात कारवाई केली. हवालदार महादेव तात्याबा जगताप असे त्याचे नाव आहे.

एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल होता. त्याचा तपास हवालदार जगताप यांच्याकडे होता. त्याचे आरोपपत्र दाखल नव्हते. ते दाखल करण्यासाठी संबधित हवालदाराने त्यांच्याकडे चार हजारांचा लाच मागितली. त्या बाबत संबधितांनी लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंध विभागाने आज त्याची खात्री केली. त्यावेळी हवालदार जगता यांनी लाच मागितल्याचे सिद्द झाले. त्याबाबतचा गुन्हा आज दाखल करून जगताप यास अटक केली आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपाधिक्षक नाडगौडा यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी