मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या पत्नीला नोकरीस घ्या

मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या पत्नीला नोकरीस घ्या
मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या पत्नीला नोकरीस घ्या

कऱ्हाड (सातारा): वीज वाहिन्या जोडत असताना वीज प्रवाह सुरू होऊन मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या पत्नीला तातडीने नोकरीस घ्यावे व मृत्युस कारणीभुत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

वीज वाहिन्या जोडत असताना अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने शॉक लागून वायरमनचा खांबावरच मृत्यू झाल्याची घटना निगडी (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी (ता. 20) सकाळी घडली. धोंडीराम दत्तू गायकवाड (वय 26 रा. करवडी, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे.

दरम्यान, त्यांच्या पत्नीला वीज कंपनीने तातडीने नोकरीस घ्यावे, त्यांना भरीव आर्थिक मदत करावी आणि धोंडीराम यांच्या मृत्यूस कारणीभुत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी दिवसभर करवडी आणि निगडी ग्रामस्थांनी संघर्ष करुन मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वातावरण तंग झाले होते. त्यासाठी वीज कंपनीसमोरच ग्रामस्थांनी ठिय्या मारल्यानंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील लेखी पत्र दिल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल कऱण्याची कार्यवाही झाल्यावरच ग्रामस्थांनी रात्री मृतदेह ताब्यात घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com