कऱ्हाडमध्ये मुसळधार; पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय

कराडमध्ये पावसाचे पाणी साचल्याने गैरसोय
कराडमध्ये पावसाचे पाणी साचल्याने गैरसोय

कऱ्हाड : कऱ्हाड पाटण तालुक्यातील काल दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पाटण तालुक्यातही दमदार पावसाने कोयना धऱणाच्या पाणी साठ्यात वाढ होवु लागली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१५९.१० फुट व जलाशयाचा पाणीसाठा १००.४९ टीएमसी झाला. पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी उपयुक्त आहे.

कऱ्हाड-पाटण तालुक्यात पावसाने काल दुपारनंतर दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील चावडी चौकानजीकच्या मनोऱ्यासमोरील बटाणे गल्लीत गटर तुंबल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचुन राहिले. बराच काळ पाणी साचुन राहिल्याने नागरिकांना अक्षरशः बाहेर पडणे काहीकाळ मुश्कील झाले होते. पालिकेच्या कर्मचाऱयांनी प्रयत्न करुन त्या पाण्याला वाट करुन दिली. कोल्हापुर नाका, दत्त चौक, स्टेशन रस्ता, जुना कृष्णा पुल यासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

रस्त्यांची कामे नुकतीच करुनही शहरात पाणी साचल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. बसस्थानक आवारातही पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कोयना धरणा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला होता. मात्र कालपासून परतिच्या पावसास सुरुवात झाली. काल दुपारी नवारस्ता परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला होते. आज चार वाजल्यापासून कोयना धरण परिसरासह तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली.

परतीच्या पावसामुळे पोटऱ्यात आलेल्या भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१५९.१० फुट व जलाशयाचा एकुण पाणीसाठा १००.४९ टीएमसी आहे. चोवीस तासात कोयनानगरला ५३ (४०७०) मिलीमीटर व नवजाला ५५ (४८०८) मिलीमीटर व महाबळेश्वरला १८ (४०६०) पावसाची नोंद झाली आहे. पायथा वीजगृहातुन सोमवारी सायंकाळी सहा वाजता सुरु करण्यात आले आले. त्यातून दोन हजार ४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com