नदीत कुत्रे मरून पडल्याने पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न

नदीत कुत्रे मरून पडल्याने पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न
नदीत कुत्रे मरून पडल्याने पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न

कऱ्हाड (सातारा): येथील कोयना नदीतील कोयनेश्वर मंदीरामागील बाजूस नदी पात्रात कुत्रे मरून पडले आहे. दोन दिवसापूर्वी ते नदीत टाकलेल्या वायरमध्ये अडकून कुत्र्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होतो आहे. नदी पात्राता कुत्र्याचे शव फुगून वर आल्याने ते नागरीकांच्या नजरेस पडले. कोयनेच्या नदीत कुत्रे मरून पडल्याने पाण्याच्या शुद्धीकरणाचा त्याचा किती परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. मात्र, पाणी शुद्धीकरणावर परिणाम होणार नाही अशी काळजी घेत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

कुत्र्याचे शव पडल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. मात्र सायंकाळ पर्यंत ते शव बाहेर काढण्यासाठी कोणीही तिकडे फिरकले नाही. कुत्र्याचे शव पडल्याची माहिती मिळाली आहे. ते बाहेर काढण्यासाठी लोक पाठवली आहेत, अशी माहिती नगर अभियंता एम. एच. पाटील यांनी दिली.

येथील पायऱ्याखालील भागापासून कोयना नदीकडे जाण्यासाटी रस्ता आहे. तेते कोयनेश्वर मंदीर आहे. तेथे घाटही बांधण्यात आला आङे. त्या कोयनेश्वर मंदीरामागे नदी पात्र आहे. त्या नदी पात्रात एख काहील चालवली जाते. ती कोण चालवते याची कल्पना कोणालाच नाही. त्याची परवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे ती काहील अवैध रित्या वापरली जात आहे. ती काहील या किनार्यापासून त्या किनाऱ्याकडे नेण्यासाठी नदीत दोन्ही काठाला सांधमारा रोप टाकण्यात आला आहे. तो रोप नदीत दिसतो आहे. त्या रोपाच्या आधारानेच काहील इकडून तिकडे परिवली जाते. त्याच रोपात अडकून कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. किमान दोन दिवासपूर्वी ते कुत्रे त्य़ा रोपात अडकून राहिल्याने मृत्यूमुखी पडले असावे, असा अंदाज आहे. त्या कुत्र्याचे शव फुगून वर आल्याने ते नागरीकांच्या नजरेस आज पडले.

फुगलेल्या कुत्र्य़ाचे शव एखाद्या व्यक्तीसारखे दिसत होते. काही लोकांनी सकाळी ते शव दिसताच त्यांनी पालिकेत त्याची माहिती दिली. पालिकेत सकाळी कलवले तरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणीही व्यक्ती तेथे आले नव्हते. मुक्याधिकारी यशवंत डांगे यांनाही त्याबाबत कोणतीच कल्पना नव्हती. त्याची माहिती मिळालेली नाही. तरिही लोकांना खात्री करायला सागंून ते शव बाहेर काढण्यासाठी आदेश देवू, असे श्री. डांगे यांनी संगतिले. कुत्र्याचे शव आढळून आळ्याने पिण्याच्या पाण्यावर त्याचा कितपत परिणाम होणार याबाबत शहरातील शनविरा पेट भागात त्य़आची चर्चा होती. पालिकेने त्या मृत कुत्र्याचे शव त्वरीत बाहेर काढून पाणी शुद्धतेतबाबत काळजी घेण्याची मागमी नागरीकातून होत आहे. त्याबाबत नगर अभियंता एम. एच. पाटील म्हणाले, कुत्र्याचे शव पडल्याची माहिती आत्ताच कलाली आहे. ते फुगून वर आले आहे. त्वरीत त्या बागात लोक पाठवून ते सव बाहेर काढण्यात येईल. त्या कुत्र्याच्या शवाचा पाण्याच्या शुद्धीकरमावर काही परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र तसे काही होवू नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत.

सोशल मिडीयावरही चर्चा..
कुत्र्याचे शव पडल्याची माहिती पालिकेला सायंकाळी पाचच्या सुमारास समजल. वास्तविक दुपारी दोन पासून ते शव कोयना नदीच्या पात्रात तरंगत होते. त्याची सोशल मिडीवरही जोरात चर्चा सुरू होती. दक्ष कऱ्हाडकर नावाच्या वॉटस् ग्रपुरही त्याची चर्चा रंगली होती. त्या ग्रुपवर पालिकेचे नगरसवेक, अधिकारीही आहेत. मात्र त्या चर्चेकडे पालिकेतील जबाबदार लोकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत होते. सायंकाळी पानंतर ते शव हटवण्यासाठी नदीकडे लोक पाठवल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com