साताराः कोयनेच्या ऐतिहासिक प्रितीसंगमावर कन्यागत शाहीस्नान

सचिन शिंदे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): कन्यागच पर्वच चालू काळ व ऋषि पंचमी असा योग आल्याने कृष्णा व कोयनेच्या ऐतिहासिक प्रितीसंगमावर आज (शनिवार) कन्यागत शाहीस्नान पार पडले. महिलांनी तेथे पूजा, दर्शन व स्नासाठी गर्दी केली होती. शेकडो महिलांनी नदीकाठी सप्तऋषिंची पुजा केली.

वयाच्या तीस चाळीस वर्षानंतर उदभवणाऱ्या विविध विकारांचे शमनासह स्वस्थ्यासाठी भाद्रपद पंचमीला ऋषिपंचमी व्रत केले जाते. त्यात बैलांकरवी मेहनत केलेले कोणतेही भाजी, अन्न न घेता नैर्सगिक अन्न, फळ भाज्यांचे सेवन केले जाते. शेतात व बांधावर सहज उपलब्ध होणाऱ्या आखाडा तणसदृश्य वनस्पतीच्या काडया तोडांने चावत नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. त्या वनस्पतीच्या सेवनांने शरीरातील त्रिदोषांचे शमन होते, असे आर्युवेद सांगितले आहे. विशेष करून महिलांना ते लाभदायक आहे, असेही नमूद आहे. पांढरी वस्त्र नेसून नदीकाठी वाळूचे शिवलिंगा करुन सप्तऋषिंची पुजा केली जाते. आजच्या ऋषिपंचमीच्या स्नानाला कन्यागत पर्व कालामुळे विशेष महत्व होते. दोन्ही स्नानाचे एकत्रीत योग आल्यामुळे भाविकांसाठी पर्वणी आहे. कऱ्हाडच्या प्रितीसंगमावर पहाटेपासून पंशिचम महाराष्ट्रातील भाविकांनी शाही स्नानाचा योग साधला. त्यात महिलांचे प्रमाण जास्त होते.

नगरपालिकेविषयी भाविकांमध्ये नाराजी
ऋषिपंचमी व कन्यागत स्नानासाठी येणाऱ्या महिलांसाठी नगरपालिकेने कोणतीही सोय केली नव्हती. कपडे बदलताना महिलांची कुचबणा झाली. सोय नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.