जाधव खून प्रकरणी संशयित पोलिस निरीक्षक धस न्यायालयात हजर

सचिन शिंदे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पोलिस निरीक्षक धस यांना अटक केली नव्हती. त्यांनी जामीनासाठी प्रयत्न केले होते.

कऱ्हाड : करमाळा येथील रावसाहेब जाधव खून प्रकरणातील संशयित पोलिस निरीक्षक विकास धस आज येथील न्यायालयात हजर झाले.

१९ जून २०१६ रोजी रावसाहेब जाधव यांचा पोलिस कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात त्याचे मेहुणे अनिल डिकोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास राज्य गुप्तचर विभाग करत आहे.

डिकोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यात पोलिस निरीक्षक धस, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत कांकडकी यांच्यासह बाराजणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात टप्प्या टप्प्याने सर्व संशयित अटक झाले आहेत. त्यात काहीजण जामिनावर बाहेर आहेत. पोलिस निरीक्षक धस यांना अटक केली नव्हती. त्यांनी जामीनासाठी प्रयत्न केले होते.

त्याशिवाय फिर्यादीला आव्हान देणारी याचिकाही दाखल केली होती. त्या प्रकरणात आज तब्बल 1 वर्ष 20 दिवसांनी पोलिस निरीक्षक धस फौजदारी न्यायालयात हजर झाले. त्यांना उद्या (शुक्रवार) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश झाला आहे. उद्या त्यांना राज्य गुप्तचर विभाग ताब्यात घेईल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :