सातारा जिल्ह्यात खासगी सावकारांवर पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): सावकारी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही पैसे मागणीचा तगादा लावणाऱ्या दोन खासगी सावकारांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही सावकार सख्खे भाऊ आहेत. संभाजी पांडुरंग होलमुखे व सुर्यकांत पांडुरंग होलमुखे अशी त्यांची नावे आहोत.

होलमुखे हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर येथील आहेत. किरण होलमुखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारवाई झाली आहे. किरणने दहा टक्के व्याजाने 25 हजार रूपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. ती रक्कम त्याने सात ऑगस्ट 2016 ला व्याजासह परत केली होती. मुद्दल 25 हजार व व्याज 12 हजार 500 अशी रक्कम परत केली होती. तरी सुद्धा त्यांचा तगादा होता. त्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :