घरफोड्या, वाहनचोऱ्या करणाऱ्या युवकांची टोळी ताब्यात

सचिन शिंदे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पोलिसांनी चिखलातून पाठलाग केला. अर्धा किलोमीटर लांब पाठलाग केल्यानंतर पोलिसांना त्या भागाला वेढा टाकला.

कऱ्हाड : घरफोड्या व वाहनचोऱ्या करणाऱ्या महाविद्यालयीन युवकांच्या टोळीकडून तेरा दुचाकी, चार घरफोड्या व दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एकजण अल्पवयीन आहे. अनिल विठ्ठल मोहिते (वय १९, रा. कुसरूंड ता. पाटण), राजेंद्र विलास संकपाळ (२७, विहे, ता. पाटण) व अमीत हणमंत(२१, अंतवडी, ता. कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. चोरट्यांचा पाठलाग करून पकडणाऱ्या पोलिसांना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी १५ हजारांचे पाकितोषिक जाहीर केले आहे, असेही ढवळे यांनी सांगितले. 
 
विद्यानगर भागातून काल रात्री पोलिस ठाण्यात फोन आला. गुरूदत्त काॅलनी येथे चोरटे आले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी रात्रगस्त घालणारे सहायक पोलिस निरिक्षक दिपीका जौंजाळ, हवालदार जयसिंग राजगीर, सतीश जाधव, गणेश राठोड, गणेश कुंदे आदी घटनास्थळी पोचले. त्यावेळी चोरटे अंधराचा फायदा घेवून शेतात पळाल्याचे त्यांना नागरिकांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी चिखलातून पाठलाग केला. अर्धा किलोमीटर लांब पाठलाग केल्यानंतर पोलिसांना त्या भागाला वेढा टाकला. त्यावेळी दोघेजण जागीच सापडले. त्यांचा एक साथीदारही पोलिसांनी ताब्यात घेतला. तो अल्पवयीन होता. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला. त्याबाबत पोलिसांनी आज माहिती दिली.

त्याबाबत ढवळे म्हणाले, त्या चोरट्यांना काल ताब्यत घेण्यात आले. त्यावेळी टोळीने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यात सातारा व सांगली जिल्ह्यातील तेरा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. त्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. रात्री पार्कींग केलेल्या दुचाकी त्यांनी चोरल्या आहेत. रात्रभर अभ्यासाच्या नावाखाली फिरून एखादी गाडी हेरायची. ती चोरून त्यावरून दुसरा गुन्हा करायचा, अशी त्यांची मोडस आहे. त्या चोरलेल्या दुचाकी अंतवडी, विहे व येळगाव येथे विकल्या होत्या. त्यातील काही दुचाकीवरून त्यांनी शहर, विद्यानगर परिसरात चार घरफोड्यी केल्या आहेत. त्यातील काही मुद्दमालही जप्त केल्या आहेत. आगाशिवनगर येथे दोन सोनसाळखी चोरीचे गुन्हे त्यांनी कबुल केले आहेत. दोन दिवसापूर्वी चोरट्यांचा पाठलाग करून पकडणाऱ्या चौघा पोलिसांना रोख १५ हजारांचे पारितोषिक पोलिस अधीक्षक पाटील यांनी जाहीर केले आहे.

पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव म्हणाले, दिवसभर काॅलेज करून रात्री टोळी बाहेर पडत होती. पोलिसांनी अडवलेच तर अभ्यासासाठी गेलो होतो. असे उत्तर चे देत होते. अपार्टमेंट, काम्पलेक्सच्या पार्कीगमध्ये लावलेल्या दुचाकी स्पेल्डंर टोळीने चोरल्या आहेत. ज्या स्पेल्डंर लाॅक नाहीत. त्याच दुचाकी यांनी लंपास केल्या आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news karad robbers gang nabbed