कऱ्हाडच्या धपाटा हाऊसने उभे केले 30 महिलांचे संसार

कऱ्हाडच्या धपाटा हाऊसने उभे केले 30 महिलांचे संसार
कऱ्हाडच्या धपाटा हाऊसने उभे केले 30 महिलांचे संसार

शेखर चरेगावकरांच्या संकल्पनेतील यशवंत उद्योग समूहाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद

कऱ्हाड (सातारा): पिझ्झा हाऊस, पराठा हाऊस जसे चालतात तसे महाराष्ट्रीयन धपाटा हाऊसही चांगले चालू शकेल आणि त्यातून लोकांना पौष्टिक अन्नही देता येईल या उद्दात हेतूने राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या संकल्पनेतून यशवंत उद्योग समुहाने येथे धपाटा हाऊस सुरु केले. तीन वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेले धपाटा हाऊस चांगले चालले असून त्याला मोठी मागणी असल्याने केवळ तीनच वर्षात तीन ठिकाणी शाखा विस्तारही करता आले हे त्यांचे यशच आहे. त्यामाध्यमातून लोकांना पौष्टिक अन्न देण्याबरोबरच त्यातून सुमारे 30 महिलांना रोजगार मिळाला. त्यामुळे संबंधित महिलांचे कुटुंबही उभे राहण्यास मदत होवून महाराष्ट्रीयन पदार्थाला बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

सध्या पाश्च्यात्य पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आकर्षक सजावटीत आणि स्टायलेस्ट दुकानात त्यांची विक्री केली जात असल्याने युवक-युवतींत त्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत महाराष्ट्रीयन पदार्थ हे पौष्टिक पदार्थ आहेत. मात्र, त्यांना योग्य प्रकारे विक्रीची व्यवस्था नसल्याने त्यांना मागणी कमी आहे. सध्या पिझ्झा-बर्गर हाऊसमध्ये मोठी गर्दी असते. त्याला मागणीही चांगली आहे. त्याच दर्जाच्या सोयी-सुविधा देवून आपलेही महाराष्ट्रीयन धपाटे बाजारपेठेत चालू शकेल ही संकल्पना श्री. चरेगावकर यांना सुचली. त्यांनी यशवंत उद्योग समुहातील पदाधिकारी, प्राजक्ता पाठक व त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यासंदर्भात चर्चा केली. त्यामध्ये लोकांना पौष्टिक पदार्थ खायला मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच त्यातून महिलांना रोजगार मिळून त्यांची कुटुंब उभी राहतील, असे विचार श्री. चरेगावकर यांनी मांडले. त्यावर विचारनिमीमय झाल्यानंतर तीनवर्षापुर्वी यशवंत बॅंकेसमोरील जागेत धपाटा हाऊसचा श्रीगणेशा झाला. पहिले काही महिने प्रसार होईपर्यंत ग्राहक मिळवताना अडचणी आल्या. मात्र, त्याची प्रसिध्दी झाल्यानंतर सध्या नारगिकांना धपाटा हाऊसमध्ये नंबर येण्याठी वेटींग करावे लागते एवढी गर्दी होते. तीन वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेले धपाटा हाऊस चांगले चालले असून, त्याला मोठी मागणी असल्याने केवळ तीनच वर्षात तीन ठिकाणी शाखा विस्तारही करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून लोकांना पौष्टिक अन्न मिळण्याबरोबरच सुमारे 30 महिलांना रोजगार मिळाला. त्यामुळे संबंधित महिलांचे कुटुंबही उभे राहण्यास मदत होवून महाराष्ट्रीयन पदार्थाला बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

150 पदार्थ व दररोज ऑर्डरही
धपाटा हाऊमध्ये ते खायला यायला ज्यांना जमत नाही त्याचबरोबर ज्यांना कार्यक्रमाच्या जेवणासाठी ते द्यायचे आहेत त्यांच्यासाठी धपाटा हाऊसमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यांना ऑर्डर घेवून ते तयार करुन देण्यात येतात. दररोज अशा ऑर्डर त्यांना येतात. त्याचबरोबर धपाटा हाऊसमध्ये धपाट्याबरोबरच 150 प्रकारचे महाराष्ट्रीयन पदार्थही उपलब्ध करण्यात येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com