कऱ्हाडमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ; एकाचा मृत्यू

सचिन शिंदे 
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

शहरात वेगवेगळ्या रूग्णालयात ४४ लोकांना त्रास जाणवू लागला आहे.

कऱ्हाड ः तालुक्यात स्वाइन फ्लूच्या रूग्णात वाढ होत आहे. त्यातच काल रात्री निगडी (ता. कऱ्हाड) येथील एकाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. शंकर गणपती माने (वय ६७) असे संबधिताचे नाव आहे.

मसूर भागात स्वाइन फ्लूचा आठवड्यात तिसरा बळी गेला आहे. त्यामुळे भागात खळबळ उडाली आहे. यापूर्वी निगडी व चिखली येथील रूग्ण दगावले आहेत.

शहरात वेगवेगळ्या रूग्णालयात ४४ लोकांना त्रास जाणवू लागला आहे. त्यातील १४ रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे उपजिल्हा रूग्णालयातून सांगण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :