खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देण्याची शिफारस करणार: तावडे

सचिन शिंदे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): भारताला ऑलम्पीकमध्ये पहिले पदक मिळवुन देणाऱ्या खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणार आहे, अशी ग्वाही क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिली.

खाशाबा जाधव यांच्या नावाने येथे होणाऱ्या क्रीडा संकुलासाठी सरकारकडुन तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. त्याबाबत तातडीच्या झालेल्या बैठकीत वरील निर्णय त्यांनी जाहीर केला. त्याची माहिती खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी दिली. खाशाबा जाधव यांच्या नावाने तीन वर्षापासुन बंद असलेली कुस्ती स्पर्धा यंदापासुन घेण्यात येईल, अशेही मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई येथे तातडीने बैठक घेण्यात आली. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले, रणजित जाधव, अॅड. संभाजीराव मोहिते, क्रीडा विभागाचे नरेंद्र सोपल व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. त्या बैठकीत क्रीडा संकुल, खाशाबा जाधव यांच्या नावाने सुरु होवुन बंद पडलेली स्पर्धा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचवेळी खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळावा यावरही चर्चा झाली. त्यासाठी केंद्र सरकारकडे तशी शिफारस करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. त्यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलासाठी सरकारकडुन तीन कोटी रुपयांचा निधी, देण्यात येईल अशेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :