खड्ड्याच्या भूतांसाठी महाराजांचा उतारा 

अंकुश चव्हाण
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

रत्यावर पडलेल्या खड्डासाठी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते याकडे काणाडोळा करत आहे.

कलेढोण (ता. खटाव, सातारा ) : येथील मल्हारपेठ -पंढरपूर रस्त्याला लागीर झालं असून त्यासाठी पाचवड ता खटाव येथील माणिक महाराजांनी हे लागीर (भूत) उतरविण्यासाठी चक्क हळद, कुंकू व गुलाल टाकून खड्ड्यांतील भूत उतरविण्यासाठी पूजन करून अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

येथील मल्हारपेठ - पंढरपूर या राज्य महामार्गावर पडलेल्या खड्डामुळे रस्तावर अनेक अपघात होत आहेत. रत्यावर पडलेल्या खड्डासाठी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते याकडे काणाडोळा करत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पाचवड (ता. खटाव) येथील माणिक महाराज यांनी या मार्गावर पडलेल्या खड्डांना गोल करून त्यावर हळद - कुंकू, गुलाल टाकून खड्डांचे भूत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :