कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला

सचिन शिंदे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पाणीसाठा नियंत्रणात आल्यान कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर केले आहेत. पायथा वीजगृहातुन दोन हजार १०० व वक्र दरवाजातुन १४ हजार १३४ असा एकुण १६ हजार २३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१६३.०१ फुट आहे. चोवीस  तासात कोयनानगरला १० (४४५४), नवजाला १९ (५४०६) व महाबळेश्र्वरला १ (४५२२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. मात्र धरणात येणारी पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून कोयना धरणाची पाणी पातळी १०४ टीएमसीवर कायम आहे.

पाऊस मंदावल्याने पाणसाठा नियंत्रणात आला. त्यामुळे अडीच फुट उडलेले दरवाजे दीड फुटावर कोयना धरण व्यवस्थापन विभागाने आणले आहेत. धरणात एकुण  १०४.७१ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना नदीपात्रात पायथा वीजगृह व सहा वक्र दरवाज्यातुन १६ हजार २३४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. पाण्याची आवक जास्त होती म्हणुन पाणीसाठा नियंत्रणासाठी अडीच फुटावर दरवाजे नेण्यात आले होते. त्यामुळे पायथा वीजगृहातुन दोन हजार १०० क्युसेक्स व वक्र दरवाजातुन २३ हजार ३५१ असा २५ हजार ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत येत होता. पावसाचा जोर मंदावला आहे.

पाणीसाठा नियंत्रणात आल्यान कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर केले आहेत. पायथा वीजगृहातुन दोन हजार १०० व वक्र दरवाजातुन १४ हजार १३४ असा एकुण १६ हजार २३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१६३.०१ फुट आहे. चोवीस  तासात कोयनानगरला १० (४४५४), नवजाला १९ (५४०६) व महाबळेश्र्वरला १ (४५२२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रतिसेकंद २३ हजार ११८ क्युसेक्स पाण्याची आवक जलाशयात होत आहे.

Web Title: Satara news Koyna dam rain