कोयना धरणाचे दरवाजे कधीही उघडले जातील; सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाचे दरवाजे कधीही उघडले जातील; सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाचे दरवाजे कधीही उघडले जातील; सतर्कतेचा इशारा

कऱ्हाड (सातारा): कोयना धरणा पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात सरासरी दोनशे मिलीमीटरने पाऊस झाला आहे. नवजाला विक्रमी 285 मिलीमिटर पावसाची आज नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्याने 102 टीएमसीचा टप्पा आज ओलांडला. पावसाचा जोर व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक अशीच कायम राहिल्यास येत्या 48 तासात कोयना धरणाचे दरवाजे कधीही उघडले जातील, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असी नोटीसही कोयना धरण व्यवस्थापनाने बजावली आहे. पावसामुळे पायथा वीजगृह पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठांवर परिणाम झाला आङे. सोमवारी पाचनंतर परतीच्या पावसाचे धरण पाण लोट क्षेत्रासह तालुक्यात दमदार आगमन झाले. रात्रभर पाऊस कोसळत होता. पहाटे पासुन सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाचा जोर मंदावला होता. पुन्हा दहा वाजल्यापासुन संततधार पावसाच्या सरी कोसळु लागल्या. दिवसभर पाऊस कोसळत होता. मुसळधार पावसामुळे नदी, नाले व ओढे पुन्हा दुथडी भरुन वाहु लागले. वादळी वारे नसल्याने कोठेडी नुकसान झाले नाही. सप्टेंबर सुरु झाला आणि पावसाचा जोर कमी झाला होता. कधी उघडीप तर कधी पावसाची रिपरिप पहावयास मिळत होती. परंतु आजच्या पावसाने 18 ते 23 ऑगष्ट पाच दिवसात पडलेल्या पावसाची आठवण करुन दिली. यंदा तीन सप्टेंबरला धरणाचा एकुण पाणीसाठा 101.78 टीएमसी होता. त्यानंतर पाऊस थांबला. त्यावेळी पाण्याची पातळी दहा सप्टेंबरला 99.74 इतकी खाली उतरली. त्यानंतरही पावसाचा जोर ओसरल्याने 15 सप्टेंबरला पाणी पातळी अजून एका फुटाने घसरली. ती 98.57 टीएमसीवर आली. तीन दिवसात झालेल्या धरणाची पाणी पातळी 3.43 टीएमसीने वाढली. कोळसा तुटवड्यामुळे कोयना जल विद्युत प्रकल्पातून जादा वीज निर्मीती केल्याने पुन्हा पाणीसाठा ९८.५६ टीएमसी पर्यंत आला होता. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे प्रथमच १०२ टीएमसीचा टप्पा धरणाने ओलांडला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पायथा वीजगृहातुन पाणी सोडण्याची शक्यता आहे. धरणाची महिन्याची निर्धारीत पाणीपातळी २१६३.२ फुट आहे. उद्यापर्यंत जर ही पातळी पावसामुळे पुर्ण झाली तर सहा वक्र दरवाजातुन पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येईल, असे धरण व्यवस्थापन विभागाकडुन सांगण्यात आले. तसी वोटीसही त्यांनी जारी केली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१६१.०१ फुट व जलाशयाचा एकुण पाणीसाठा १०२.११ टीएमसी झाला आहे. चोवीस तासात कोयनानगरला १८० (४३२६), नवजाला २८५ (५१७१) व महाबळेश्र्वरला १५८ (४३२८) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात प्रतिसेकंद ११ हजार ७७० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

सतर्कतेचा इशारा
कोयना धरण व्यवस्थापनेने आज सायंकाळी पोलिस खात्यासह त्यांच्या विभागातंर्गत आणि वायरलेस वरून योत्या 48 तासाता कोयना धरणाचे दरवाजे कधीही उघडू अशा इशारा दिला आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी दिली. ते म्हणाले, कोयना पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरमाते येणारा पाण्याचा फ्लो मोटा आहे. तो अशचा कायम राहिल्यास 48 तासात कधीही कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे उघडले जातील. तसा इसाराही आम्ही, आमच्या, महसूल व पोलिस कात्याद्वारे नदीकाठच्यागावांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com