कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे उघडले

Koyna Dam
Koyna Dam

कऱ्हाड : कोयना धरणा पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून नऊ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

अवघ्या तासात पायथा वीज गृह सुरू होणार आहे, त्यातूनही कोयना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात २.१७ टीएमसीने वाढ झाली आहे. आत्ता कोयना धरणात १०४.१७ टीएमसी पाणी साठा आहे. कोयना जलाशयाची सप्टेंबर मधील निर्धारीत जलपातळी १०३ टीएमसी आहे. ती गाठल्याने आज सकाळी धरणाचे सहाही वक्र दरवाजे उघडण्यात आले.

तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल (सोमवारी)  पाचनंतर परतीचा पाऊस कोसळतो आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१६२ फुट आहे. जलाशयाचा एकुण पाणीसाठा १०४ टीएमसी झाला आहे. चोवीस तासात कोयनानगरला १५१  (४३८८), नवजाला २२३ (५१य२६२) व महाबळेश्र्वरला १९३ (४४६९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात प्रतिसेकंद ११ हजार ७७० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरण व्यवस्थापनेने आज सकाळी कोयना धरणाचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे चोवीस तसात ते पाणी सांगली जिल्ह्याच्या भागात पोचेल. त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com