कोयनेतील पाणीसाठ्याने ओलांडला 75 टक्क्यांचा टप्पा

सचिन शिंदे
मंगळवार, 25 जुलै 2017

कोयनेचा पाणीसाठा ७५.१४ झाला आहे. चोवीस तासात कोयनेच्या पाणी साठ्यात तब्बल २.८८ टिएमसीने वाढ झाली आहे. सकाळपासून पाऊस सुरूच होता. कोयनेचा पाणी साठा ७६.१४ टीएमसी झाला.

कऱ्हाड : कोयना धरण परिसरासह सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोयनेच्या पाणी साठ्याने ७५ टक्क्यांचा टप्पा ओलांडला.

कोयनेचा पाणीसाठा ७५.१४ झाला आहे. चोवीस तासात कोयनेच्या पाणी साठ्यात तब्बल २.८८ टिएमसीने वाढ झाली आहे. सकाळपासून पाऊस सुरूच होता. कोयनेचा पाणी साठा ७६.१४ टीएमसी झाला. चोवीस तासात कोयनेला १०६ (२९४१) मिलीमिटर, नवजाला ११९ (३२७२) व महाबळेश्वरला ९६ (२७७१) पावसाची नोंद झाली आहे.

चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २.८८ टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१३६ फुट तर पाणीसाठा ७६.१४ टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रतिसेकंद ५९ हजार ६५६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: