कृष्णामाईच्या स्वच्छतेसाठी राबले हात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

कऱ्हाड - कोणीही यावे आणि कचरा, निर्माल्य कृष्णा नदीत फेकावे, सांडपाणीही नदीत सोडावे, अशीच सध्या कृष्णामाईची अवस्था झाली आहे. त्यामुळे दूषित झालेल्या कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सामाजिक बांधिलकीतून आता पालिका, स्वच्छता दूतांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतून सुमारे दोन टन कचरा नदीतून बाहेर काढण्यात आला. 

कृष्णा नदीमध्ये गावोगावचे सांडपाणी, कचरा, निर्माल्य दररोज मिसळते. त्यामुळे नदीतील पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. या नदीची अवस्था पाहून कऱ्हाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह पालिकेमार्फत स्वच्छता अभियानात नेमलेल्या स्वच्छता दूतांसह पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता नदी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. 

त्यांच्यामार्फत सुमारे दोन टन कचरा नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. शासनाने जरी प्लॅस्टिकवर बंदी घातली असली तरी स्वच्छता मोहिमेत जमा झालेल्या कचऱ्यात प्लॅस्टिकच जास्त असल्याचे आढळून आले आहे.  

नागरिकांना साद...  
कृष्णा नदीतील पाण्यावर सर्वांचीच उपजीविका असल्याने आबालवृध्दांच्या जगण्यातील अविभाज्य घटक असलेल्या कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनीही आता पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने या मोहिमेत सहभागाचे आवाहन स्वच्छता दूतांनी केले आहे.

Web Title: satara news krishna river Cleanliness