फ्लेमिंगो.. यंदा कुठे करणार 'लॅडिंग'...

अंकुश चव्हाण
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

वाढत्या पाणीसाठा व थंडीने पक्षीमित्र आंनदले 

पाच वर्षातील फ्लेमिंगोच्या नोंदी.. 

  • २१ नोव्हेंबर २०१२ (येरळवाडी : खटाव)
  • ७  मार्च २०१३ (राजेवाडी : माण)
  • २३ डिसेंबर  २०१४ (येरळवाडी : खटाव)
  • ५ फेब्रुवारी २०१५ (येरळवाडी : खटाव)
  • ११ नोव्हेंबर २०१६  (येरळवाडी : खटाव) 
  •  (संग्रहित माहिती :'सकाळ')

कलेढोण : खटाव- माण तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर रंगाने गुलाबी असणाऱ्या फ्लेमिंगोच्या  (रोहित) आगमनाची प्रतीक्षा पक्षीमित्र करीत आहेत. खटावमधील येरळवाडी व सूर्याचीवाडी तर माणमधील देवापूर-राजेवाडी (ता.माण) हे तलाव फ्लेमिंगोची मुक्कामाची आवडती ठिकाणे आहेत. या तलावात मुबलक व पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पक्षीमित्राच्यात आनंदाचे वातारणात असून यातील कोणत्या ठिकाणी परदेशी पाहुणे 'लॅडिंग' करणार ? याची उस्तुकता पक्षीप्रेमीना लागून राहिली आहे.

दुष्काळी खटाव-माण तालुक्यातील येरळवाडी, मायणी, कानकात्रे, सुर्याचीवाडी व राजेवाडी या तलावावर दरवर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात थंडीत फ्लेमिंगो हजेरी लावतात. ते फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत या पक्षांचे येथे वास्तव्य या तलावावर असते. उत्तरेकडील देशात वाढणाऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी व अन्नाच्या शोधात देशी - परदेशी पक्षीही तलवावर हजेरी लावतात. त्यांना पाहण्यासाठी व निरीक्षणासाठी कोल्हापूर, सांगली,पुणे आदी. जिल्हातील पक्षीप्रेमीही तलावावर हजेरी लावतात. यावर्षी खटाव तालुक्यात समाधानकारक पावसाने हजेरी हे पाहुणे लवकरच येरळवाडी, सूर्याचीवाडी माणमधील देवापूर (राजेवाडी) तलावात हे परदेशी पाहुणे  'लॅडिंग' करतील अशी आशा पक्षीप्रेमी करून आहेत.  

मागील वर्षी पाहुण्यांनी येरळवाडी व सूर्याचीवाडी तलावावर मुक्काम केला होता. सद्या तालुक्यातील तलावावर नदीसूरय, स्पून बिल, ग्रे हेरॉन , कांडेसर , चित्रबलाक, कवड्या खंड्या, चांदवा, पांढरापरीट ,पाणकावळा,पाणबुडी, पाणपाकोळी,चक्रवाक, शराटी, शेकाट्या आदी. पक्षांनी हजेरी लावली आहे.गेल्या अनेक वर्षापासून मायणी परिसरात समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने तलावात पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे तलावाकडे फ्लेमिंगोसह पर्यटकानी पाठ फिरवली आहे.

    'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :