माणमध्ये शेतातील बोअरवेलमध्ये ६ वर्षीय मुलगा पडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

दरम्यानच्या कालावधीत ग्रामस्थांनी संबंधित बोअरवेलमध्ये अडकून राहिलेला मंगेश यास सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदाई सुरु केली आहे.

म्हसवड : माण तालुक्यातील विरळी नजीकच्या कापूसवाडी येथील म्हारकी शिवारातील शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये मंगेश अनिल जाधव (वय ६ वर्षे) हा मुलगा खेळताना पडला. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

संबधित बोअरवेल सुमारे ६५० फूट खोल असून मंगेश हा मुलगा या बोअरवेल वीस फुट खोल जाऊन अडकून राहिला असून, या अपघातानंतर तो सुमारे दोन तासांच्या अवधीनंतरही बोअरवेलमध्ये हालचाल करून आराडाओरडा करीत आहे.

या घटनेची खबर मिळताच म्हसवड पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी तातडीने रवाना झाले आहेत. दरम्यानच्या कालावधीत ग्रामस्थांनी संबंधित बोअरवेलमध्ये अडकून राहिलेला मंगेश यास सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदाई सुरु केली आहे.