उत्पादने तुमची... बाजारपेठ ‘मधुरांगण’ची!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सातारा - दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे... तुम्ही त्यासाठी काही पदार्थ, उत्पादने विकू इच्छित आहात... त्यासाठी तुम्हाला बाजारपेठ मिळवायची आहे... मग, बिनधास्त राहा. ‘सकाळ माध्यम समूहा’चे मधुरांगण व्यासपीठ तुमच्या सोबतीला आहे. साताऱ्याच्या बाजारपेठेचे ‘हार्ट’ असलेल्या ठिकाणावर ‘मधुरांगण आनंद मेळा’ भरणार आहे. तुम्हीही त्वरा करा अन्‌ तुमचा स्टॉल निश्‍चित करा.

मधुरांगण व्यासपीठाच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सात ते नऊ ऑक्‍टोबर दरम्यान राधिका रस्त्यावरील ‘सातारा सिटी बिझनेस सेंटर’च्या इमारतीत महिलांच्या घरगुती व्यावसायिक उत्पादनांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. या उपक्रमाचे स्थळ प्रायोजक सातारा सिटी बिझनेस सेंटर तथा कंग्राळकर असोसिएटचे श्रीधर कंग्राळकर आहेत. 

अनेक महिला घरगुती स्वरूपात साडी, ड्रेस, ड्रेस मटेरियल, कशिदा काम, गिफ्ट आर्टिकल्स, इमिटेशन ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, सॉफ्टटॉइज, दिवाळीचे सजावट साहित्य, तसेच घरगुती मसाले, तयार पीठ, पापड, लोणचे, दिवाळीसाठीची मिठाई आदी अनेक व्यवसाय करत असतात. अशा महिलांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

याच ठिकाणी खरेदीबरोबरच सातारकर खवय्यांसाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत.  मधुरांगण सभासदांबरोबर इतर महिलांनाही स्टॉल बुकिंगची संधी असणार आहे. मर्यादित संख्या असल्याने स्टॉल बुकिंगसाठी येथील दैनिक ‘सकाळ’ कार्यालयात संपर्क करावा. प्रथम बुकिंग प्रथम प्राधान्य यानुसार स्टॉलचे वितरण केले जाईल. स्टॉलचे बुकिंग करताना पॅनकार्ड झेरॉक्‍स आवश्‍यक असेल. अधिक माहितीसाठी ‘मधुरांगण’च्या सहायक व्यवस्थापक चित्रा भिसे (मोबाईल क्र. ९९२२९ १३३५८) यांच्याशी संपर्क साधावा.

स्टॉलचे दर, नियम इतर उत्पादन विक्री
मधुरांगण सभासदांना : १५०० रुपये (१८ टक्‍के जीएसटी अधिक)
इतर महिलांना : २५०० रुपये (१८ टक्‍के जीएसटी अधिक).
अन्नपदार्थ विक्री (तयार पदार्थ, खाद्यपदार्थ)
मधुरांगण सभासदांना : १००० रुपये (१८ टक्‍के जीएसटी अधिक)
इतर महिलांना : १५०० रुपये (१८ टक्‍के जीएसटी अधिक).