मायणीत युवकाची गळा चिरून हत्या

अंकुश चव्हाण
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सकाळी फुलेनगर रस्त्यावर चांद नदीच्या कडेला मृतदेह आढळला

मायणी : येथील फुलेनगर रस्त्यालगत दादा उर्फ हरीश बबन साठे (वय २९) या तरुणाची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हत्या कोणी केली आणि त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

आज (शुक्रवार) सकाळी फुलेनगर रस्त्यावर चांद नदीच्या कडेला हरीश हा मृत अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यानंतर तपास कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :