नागरिकांना लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला "मोका' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सातारा - रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हे कायद्यानुसार (मोका) पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सातारा - रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हे कायद्यानुसार (मोका) पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

दीपक नामदेव मसुगडे व त्याच्या तीन साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 16 एप्रिल 2018 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे या टोळीने सायकलवरून जाणाऱ्या एकाला अडवून मारहाण करत दहा हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी मसुगडे व त्याच्या तीन साथीदारांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासात ही टोळी रस्त्यावर लुटमारी करत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर "मोका' कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर पुसेगाव पोलिस ठाण्यात या टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यात "मोका'चे कलम वाढविण्यात आले आहे. तपासासाठी हा गुन्हा वडूजचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्याकडे देण्यात आला आहे. 

Web Title: satara news Mcoca to the gang of robbers