मायक्रोफायनान्सनी तत्काळ कर्जमाफी द्यावी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सातारा - मायक्रोफायनान्स कंपन्यांनी महिलांची तत्काळ कर्जमाफी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा राजवाडा, कर्मवीर भाऊराव पाटील पथ, पोलिस मुख्यालय, पोवई नाका, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय असा काढला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मोर्चेकऱ्यांच्या तक्रारीनुसार फायनान्स इन्स्टुशन नेटवर्क (पश्‍चिम विभाग) यांना कर्जाची वसुली कायद्यातील नियमानुसार करावी, असे समजपत्र दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मनसेचे राज्याचे उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील हजारो महिलांनी विविध मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून केवळ आधारकार्ड व रेशनकार्डच्या पुराव्यांवर कोऱ्या धनादेशांवर सह्या घेऊन बचतगटांतील महिलांना कर्जवाटप केले आहे. जिल्हाधिकारी, रिझर्व्ह बॅंकेचे प्रतिनिधी, तसेच एमफिनच्या शिष्टमंडळासमोर झालेल्या बैठकीत वसुलीसाठी कोणताही प्रतिनिधी महिलांच्या घरी जाणार नाही, असे ठरविण्यात आले होते. मात्र, याचा भंग केला आहे. कर्जाचे हप्ते न दिल्यास घरातील वस्तूंचा लिलाव केला जात आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सद्यःस्थितीत कष्टकरी जनतेची मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्ज माफ करावीत, तसेच 12 टक्‍क्‍यांपेक्षा जादा व्याजदर घेऊ नये, अशी मागणी केल्याचे मोझर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

कडेगाव - आघाडी शासनाच्या काळात राज्यातील बंद उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू केली होती. योजनेची मुदत...

11.36 AM

मिरज - जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे सर्वेक्षण तीन वर्षांपूर्वी झाले; त्याचे गॅझेट मात्र अद्याप झालेले नाही. या सर्वेक्षणाचे...

11.06 AM

कोल्हापूर -  कर्जमाफी योजनेतील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी घेतलेल्या पीक कर्जाचीही परतफेड करावी लागणार...

10.45 AM